`दिग्दर्शकाने शरीरसंबंधाची मागणी...; कास्टिंग काऊचबद्दल नीना गुप्ताचा धक्कादायक खुलासा
कास्टिंग काऊचसारख्या प्रकारातून अनेकदा अभिनेत्रींना जावे लागते. काही जणी लपून ठेवतात तर आत्तापर्यंत अनेकांनी आपल्या कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे.
Neena Gupta Casting Couch: कास्टिंग काऊचबद्दल आपण बॉलीवूडमध्ये अनेकदा ऐकत असतो. अभिनेत्रींनी सांगितेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवांबद्दल कायमच प्रेक्षकांमध्ये गदारोळ उडाला आहे. अशाच एका ज्येष्ठ अभिनेत्रींनी त्यांच्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता (Neena Gupta). आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत आलेली नीना गुप्तानं कास्टिंग काऊचबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. (actress neena gupta made shocking revelation about casting couch in bollywood)
ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांनी काही वर्षांपुर्वी 'सच कहूं तो' हे आत्मचरित्र प्रकाशित केले होते आणि या पुस्तकाने त्यांच्या चाहत्यांसाठी त्यांच्या आयुष्यातील अनेक अध्याय उघडले आहेत. बॉलीवूडमधील अभिनेत्री म्हणून त्यांचा करिअरमधला सर्वात धक्कादायक किस्सा होता तो म्हणजे कास्टिंग काऊचचा. कास्टिंग काऊचमुळे (Neena Gupta on Casting Couch) नीना गुप्ता यांना धक्कादायक प्रकाराला सामोरे जावे लागले होते.
आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'
पुस्तकातील (Neena Gupta Book) एका उतार्यात, तिने लिहिले, "एक दिवस, एका मित्राने मला एका निर्मात्याला भेटायला सांगितले जो दक्षिणेतील एक मोठा चित्रपट शूट करत होता. तो गेले अनेक दिवस मुंबईत येत होता आणि कामानिमित्त सन-एन-सँड हॉटेलमध्ये थांबला होता. मी हॉटेलवर पोहोचल्यावर लॉबीतल्या फोनवरून प्रोड्युसरला फोन केला. 'हो, हो, मी तुमची वाट पाहत होतो,' असं तो म्हणाला, 'चला वरच्या मजल्यावर.' 'मग माझी भूमिका काय आहे सर?' असं मी त्याला विचारलं तेव्हा शेवटी त्याने श्वास रोखून धरल्यावर मी पुन्हा प्रश्न विचारला. 'हिरोईनची मैत्रीण' तो म्हणाला.
त्याने हे सांगितल्यावर मला वाटलं हा तर फारच (Neena Gupta Husband) छोटासा रोल आहे. मी म्हटलं 'ठीक आहे... मला आता जायचे आहे, सर' मी म्हणाले. तू कुठे जात्येस असं त्यानं विचारलं तेव्हा तो खूप गंभीर झाला होता. तू इथे रात्र घालवशील का असा प्रश्न त्यानं मला विचारला आणि हे ऐकताच माझं रक्त गोठलं मला कळलंच नाही की तो असं का बोलला.
आणखी वाचा - गव्हापासून नाही तर चण्याच्या डाळीच्या पोळ्या ठरतील आरोग्यदायी... पाहा फायदे
मध्यंतरी दिलेल्या एका मुलाखतीत घडलेल्या घटनेची आठवण करून नीना यांनी अशा परिस्थितीत अधिक "सावध" राहायला हवे होते, असे मत व्यक्त केले.
नीना गुप्ता अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदान्ना यांच्यासोबत 'गुडबाय' (Goodbye), मनोज बाजपेयी आणि साक्षी तन्वर यांच्यासोबत 'पंचायत' आणि 'डायल 100' मध्ये दिसल्या होत्या.