Neetu Kapoor Birthday: आज नीतू कपूर यांचा वाढदिवस आहे. या वयातही त्या अगदी एव्हरग्रीन दिसतात. आज त्यांचा 65 वा वाढदिवस होता त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अख्ख्या बॉलिवूड इडस्ट्रीनं यावेळी नीतू सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. त्याचसोबत दरवर्षीप्रमाणे त्यांनी आपल्या कुटुंबियांसोबत आपला वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची बहीण रिधिमा कपूर आपल्या लेकीसह यावेळी उपस्थित होते. त्यांनी एकत्रितपणे नीतू कपूर यांचा वाढदिवस साजरा केला आहे. सोबतच त्यांनी यावेळी एक फोटो शेअर केला आहे ज्यात रणबीर कपूर, रिधिमा कपूर, तिचा नवरा आणि तिची लेक एका फ्रेममध्ये दिसत आहेत. परंतु यावेळी नीतू कपूर यांची सून आणि नातं मात्र पाहायला मिळाल्या नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या त्यांनी इन्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यात त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, खूप आनंदी आणि सुखी दिवस होता. परंतु आलिया भट्ट आणि राहा कपूरला (माय लव्ह्स) यांना खूपच मिस केलं. सध्या त्यांच्या या फोटोनं सर्वांचेच लक्ष वेधले आहे. यावेळी आलिया आणि राहा नक्की कुठे आहेत असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला आहे. त्यामुळे अनेकांनी विविध तर्कही काढले आहेत. त्यातून अनेक दिवस झाले नीतू कपूर या आलियासोबत दिसल्या नाहीत किंवा अद्याप त्यांचा आणि राहाचा एकत्र फोटोही दिसलेला नाही त्यामुळे नेटकऱ्यांमध्येही चर्चांना उधाण आलं आहे. सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे आलियाच्या आगामी हॉलिवूड फिल्मची. ज्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून हार्ट ऑफ स्टोन पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. 


आलिया आणि राहाला केलं मिस 


आलिया भट्टनं अद्यापही आपल्या लाडक्या लेकीचा फोटो सोशल मीडियावरून शेअर केलेला नाही. मध्यंतरी तिचे काही प्रायव्हेट फोटो हे सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. त्यावर आलियानं आक्षेप घेतला होता. यावेळी आपल्या सासूबाईंसोबत एकत्रपणे त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला नसला तरीसुद्धा आलियानं इन्टाग्रामवरून नीतू यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.



यावेळी तिनं म्हटलंय की, 'हॅप्पी बर्थडे क्वीन. यू मेक एवरीथींग ब्युटीफुल. लव्ह यू सो मच' या स्टोरीला रिशेअर करत त्यांनी आलियाला आणि राहाला मिस केल्याचे सांगितले आहे. 



हेही वाचा - इटली टूरवर करीनानं खर्च केले लाखो, पण ड्रेस इतका स्वस्त का? किंमत ऐकून बसेल शॉक


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


इटलीत साजरा केला वाढदिवस 


यावेळी त्यांनी आपला वाढदिवस हा इटलीत साजरा केला असल्याचे समजते आहे. त्यामुळे तिच्या या बर्थडे सेलिब्रेशनची चांगलीच चर्चा आहे. त्याचसोबत करीना आणि सैफ अली खानही इटलीमध्ये आहेत. त्यांनीही नीतू कपूर यांनी खास शुभेच्छा दिल्या आहेत.