मुंबई : इंडस्ट्रीमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. त्यामुळे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आवडत्या कलाकाराला लग्न कधी करणार? कोणासोबत करणार असे प्रश्न विचारत आहे. असाचं प्रश्न टीव्ही विश्वातील बोल्ड अभिनेत्री निया शर्माला विचारला. नुकताचं नियाने इन्स्टाग्रामवर चाहत्याच्या अनेक प्रश्नांची उत्तर दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रश्न-उत्तरांच्या या खेळात एका युजरने नियाला लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना निया म्हणाली, 'जेव्हा कोणता मुलगा लग्नासाठी माझा हात मागेल....' सध्या नियाची ही पोस्ट सोशल मीडिया व्हायरल होत आहे. 



टीव्हीपासून ते अगदी सोशल मीडियापर्यंत आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजातून लोकप्रिय झालेली निया शर्मा कायम चर्चेत असते. टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे, दीपिका कक्कड़, मृणाल ठाकुर, मौनी रॉय यांच्या पाठोपाठ आता निया शर्मा देखील आता मोठ्या पडद्यावर दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 


स्‍टार प्‍लसवरील `एक हजारों में मेरी बहना है` या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेया निया. त्यानंतर नियाला `जमाई राजा` यामध्ये अधिक पसंद केलं गेलं आहे. निया शर्मा टीव्हीवर शेवटी एका रिअॅलिटी शो म्हणजे 'खतरों के खिलाडी' च्या माध्यमातून सीझन 8 मध्ये भेटीला आली.