मुंबई : टीव्ही आणि ग्लॅमरच्या दुनियेत कलाकारांना अनेक कठिण प्रसंगांचा सामना करावा लागतो. 'अगले जनम मोहे बिटिया ही किजो' या मालिकेच्या माध्यमातून घरा-घरात पोहोचलेली नुपुर अलंकारवर सोनं विकून उदरनिर्वाह करण्याची वेळ आली आहे. बँकेने केलेल्या फसवणुकीमुळे तिच्यावर ही परिस्थिती ओढावली आहे. २४ सप्टेंबर रोजी भारतीय रिजर्व बँकेने पंजाब एन्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेला नोटीस जारी केली होती. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय रिजर्व बँकेने पीएमसी बँकेवर सहा महिन्यांपर्यंत कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्यावर प्रतिबंध लावला आहे. त्यामुळे पीएमसी बँक कोणत्याही प्रकारचे कर्ज देण्यास कटिबद्ध आहे. त्याचप्रमाणे ग्राहक त्यांच्या खात्यातून फक्त २५ हजार रूपयांपर्यंत रक्कम काढू शकतात. 


नुपुरचे अकाउंट याच बँकेत असल्यामुळे तिला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तिच्या या कठिण प्रसंगी तिच्यावर ५० हजार रूपयांचे कर्ज झाले आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखीत आपण सध्या आर्थिक परिस्थितीचा सामना करत असल्याचे तिने सांगितले आहे. 


'अगले जनम मोहे बिटिया ही किजो' शिवाय तिने 'स्वरांगीनी', 'फुलवा', 'दिया और बाती हम' यांसारख्या मालिकांमध्ये एकपेक्षा भूमिका साकारल्या आहेत.