नवी दिल्ली : 'हेट स्टोरी' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालणारी अभिनेत्री पाओली डॅम तुम्हाला माहिती असेलच. पाओली गेल्याच महिन्यात विवाहबंधनात अडकली.


बोल्ड सीन्समुळे चर्चेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाओलीने 'हेट स्टोरी' सिनेमात आपल्या बोल्ड सीन्समुळे सर्वांच्याच मनात एक जागा निर्माण केली होती. या बोल्ड सीन्समुळे ती खूपच चर्चेतही होती. मात्र, आता पुन्हा एकदा पाओली चर्चेत आली आहे पण आता कारण बोल्ड सीन नाही तर वेगळचं आहे.


गेल्याच महिन्यात झाला विवाह


पाओलीने गेल्या महिन्यात ४ डिसेंबर रोजी गुवाहाटीतील एका रेस्टॉरन्ट मालक अर्जुन देबसोबत लग्न केलं. बंगाली परंपरेनुसार या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. या लग्नसमारंभासाठी दोघांचेही जवळचे नातेवाईक उपस्थित होते. 


हनीमूनसाठी स्वित्झरलँडमध्ये


लग्नापूर्वी दोघेही एकमेकांना डेट करत होते. लग्नानंतर हनीमुनसाठी पाओली आणि अर्जुन हे स्वित्झरलँडमध्ये गेले होते. मात्र, हनिमुन दरम्यान असं काही झालं की त्यांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागलं.


टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, स्वित्झरलँडमध्ये जोरदार हिमवृष्टी सुरु झाली आणि त्यामुळे दोघांचीही प्रकृती बिघडली. तसेच हिमवृष्टीमुळे ते कुणाशीही संपर्कही करु शकत नव्हते. रेल्वे ट्रॅक आणि रस्तेही बंद झाले होते. 


पाओलीची प्रकृती जास्तच खराब झाली. त्यामुळे हेलिकॉप्टरच्या मदतीने दोघांनाही रिसॉर्टमधून बाहेर काढलं. तसेच इतरही पर्यटकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. सध्या सर्वाची प्रकृती स्थिर असून सुरक्षित ठिकाणी आहेत.