मुंबई : बॉलिवूड कलाकारांच्या खासगी आयुष्यातील घडामोडींबाबत चाहत्यांना त्यांच्या चित्रपटांपेक्षा अधिक उत्सुकता असते ही वस्तुस्थिती. परिस्थिती काहीही असो, चाहत्यांना आपल्या आवडत्या कलाकारांच्या जीवनात नेमकं काय घडतंय हे जाणून घेण्याबाबत कुतूहल वाटत असतं. सध्या असंच काहीसं कुतूहल, उत्तसुकता व्यक्त केली जातेय एका बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच वाढदिवस साजरा करणारी ही अभिनेत्री आहे, अलाया एफ. पूजा बेदीची लेक, अलाया हिनं नुकतंच आयुष्याच्या एका नव्या वर्षात पदार्पण केलं. 


वाढदिवसाच्या निमित्तानं तिनं एका पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी काही खास मंडळीची उपस्थिती पाहायला मिळाली. 


खास व्यक्तींमध्ये स्मिता ठाकरे आणि त्यांचा मुलगा ऐश्वर्य ठाकरे यांच्याही नावाचा समावेश आहे. ऐश्वर्य अलायाचा खास मित्र आहे. 




ठाकरे कुटुंबातील ही व्यक्ती आणि अलाया यांचं नातं कायमच चर्चांमध्ये आलं आहे. ज्यामुळं पुन्हा एकदा ही व्यक्ती अलायाच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये आईसोबत आल्यानं नव्यानं चर्चांना वाव मिळाला. 


अलायाच्या या सेलिब्रेशनमध्ये अभिनेत्री आरती सिंहचीसुद्धा हजेरी होती. 


अलाया ही अभिनेत्री पूजा बेदी आणि फरहान फर्नीचरवाला यांची मुलगी आहे. 2003 मध्येच ही जोडी विभक्त झाली होती. 


अलायानंही आईच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि आता ही स्टारकिड या कलाजगतामध्ये स्वत:ची वाट बनवताना दिसत आहे.