Pooja Sawant Engagement: अभिनेत्री पुजा सावंत ही आपल्या हटके अभिनयासाठी ओळखली जाते. त्याचसोबत अनेकदा तिची चर्चाही सोशल मीडियावर होताना दिसते. तिचा नुकताच दगडी चाळ 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला होता. त्यातून मध्यंतरी ती पुष्कर जोगच्या एका चित्रपटाच्या निमित्तानं परदेशातही शूट करत होती. पूजा ही सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती आपले अनेक नानाविध फोटोजही सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसते. त्यातून पूजा सध्या सिंगल आहे. आपल्या रिलेशनशिपबद्दलही ती फार उघडपणे सध्यातरी बोलताना दिसत नाहीये. परंतु आता समाजमाध्यमांवर मात्र वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या. सध्या तिच्या साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे तिची एकच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपुर्वी अभिनेत्री स्वानंदी टीकेकर आणि गायक आशीष कुलकर्णी यांचा साखरपुडा थाटात संपन्न झाला. त्यामुळे त्यांच्या चर्चांना जोरात उधाण आले होते. त्यांच्या साखरपुड्याचे फोटोही व्हायरल होऊ लागले होते. त्यामुळे आता त्यांच्या साखरपुड्यानंतर अभिनेत्री पूजा सावंतनंही साखरपुडा उरकल्याची एकच बातमी व्हायरल झाली आहे. परंतु यावर तिनं स्वत:हूनच स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी तिनं नक्की काय म्हटलं आहे? गेल्या काही दिवसांपासून ती कोणालातरी डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे ही अभिनेत्री आता सिंगल नाही अशी खात्रीच अनेकांना वाटली होती. त्यातून तिनं आता एक ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे ज्यात तिनं ग्लॅमरस असा ब्लॅक गाऊन घातला आहे जो शिमर आणि डायमंडचा आहे. 


त्यात सर्वांचे लक्ष वेधले आहे ते म्हणजे तिच्या अंगठीकडे. हे अंगठी तिच्या ड्रेसप्रमाणे प्रचंड प्रमाणात चमकते आहे. त्यामुळे त्या लुकलुकत्या अंगठीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. त्यामुळे सध्या तिनं कोणाला डेट करते आहे का आणि सोबतच तिनं गुपचूप साखरपुडा उरकला आहे का अशीही चर्चा सुरू झाली आहे. परंतु नक्की यामागील सत्य आहे तरी काय? 


हेही वाचा - 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील 'या' कलाकारांचं मानधन माहित आहे का? बॉलिवूडपेक्षाही जास्त कमाई



तिला एका मुलाखतीत याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीनुसार ती म्हणाली की, ''नाही. मी अंगठी उजव्या हातात घातली आहे. माझा साखरपुडा झालेला नाही. ही बातमी मलाही खूप उशिरा कळली. साखरपुडा करण्यासाठी आयुष्यात कोणीतरी हवं.'', असं ती म्हणाली.