मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि फरसाण हे एक वेगळं समीकरण झालं आहे. अलीकडेच प्राजक्ताचा 'तीन अडकून सीताराम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर पुढच्या शूटिंगमधून ब्रेक घेत नुकतीच प्राजक्ता तिच्या कर्जत येथील फार्महाऊसवर विश्रांती घ्यायला पोहोचली आहे. प्राजक्ता माळी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. नेहमीच ती तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राजक्ताचे हे फोटो सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहेत. प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंना याज साठी केला होता अट्टाहास…After every film release and film shoot ; Rest at “Kunj” will be a ritual. असं कॅप्शन दिलं आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. अनेकांनी प्राजक्ताच्या या फोटोवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट्स करत प्रेमाचा वर्षाव केला आहे. तर अनेकांनी तिच्या या फोटोत फरसाण पाहून मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. 


एका चाहत्याने कमेंट करत लिहीलंय की,  नवीन प्रोडकट कधी येणार आहे प्राजक्ता फारसान... तर अजून एकाने लिहीलंय, खूप छान प्राजक्ता मला फार आवडली तुझी कल्पना असे निवांत निसर्गाच्या खुशीत अफलातून तर अजून एकाने म्हटलंय, फार्म हाऊस मस्त आहे प्राजू आणि मराठी चित्रपटाच्या चांगल्या यशानंतर आणि तू चांगला नेचर ब्रेक घेतला आहेस लव्ह यू टू डार्लिंग तर अजून एकाने लिहीलंय, फरसाण 1st pic is d best....



प्राजक्ताने काही महिन्यांपूर्वी कर्जत येथे 'प्राजक्तकुंज' नावाचं आलिशान फार्महाऊस खरेदी केलं होतं. प्राजक्ताच्या फार्महाऊसचे हे नवे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यातील एका फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोमध्ये निसर्गरम्य वातावरणात विश्रांती घेत, प्राजक्ता फरसाणचा आस्वाद घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.दरम्यान, अभिनेत्रीच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'तीन अडकून सीताराम' चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.