मुंबई :  अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मराठीती प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आत्ता पर्यंत तिने अनेक हिट सिनेमा दिले आहेत. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचं खूप मोठं फॅन फॉलोईंग आहे.  अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटात काम केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. चाहते तिच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अनेकदा तिला चाहते तिच्या लग्नाबाबत प्रश्नही विचारत असतात. पण अभिनेत्रीने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  खरंतर हा व्हिडिओ प्राजक्तराज या तिच्या दागिन्यांच्या जाहिरातीचा आहे. या मध्ये प्राजक्ता तिच्या नव्या कलेक्शनची जाहिरात करताना दिसत आहे.                          


व्हिडिओ शेअर करत प्राजक्ताने कॅप्शनमध्ये लिहीलंय की, ''आली लग्नसराई… करा दागिने खरेदीची घाई !! आता लग्न म्हटलं की खरेदी, भेटवस्तू हे आलंचआता हे सगळं एकाच छताखाली मिळालं तर ? म्हणूनच प्राजक्तराज तुमच्यासाठी घेऊन आलंय 'लग्नसराई संच' मोत्याचे दागिने असो वा सुवर्णालंकार सगळं काही मिळेल एकाच संचात संस्कृती परंपरा जपणारे, घरंदाजपणा देणारे दागिने अभिमानाने मिरवायला हवेत.'' अवघ्या काही वेळातच प्राजक्ताच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. सध्या प्राजक्ताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अनेकांनी तिच्या या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने या व्हिडिओवर कमेंट करत लिहीलंय की, खूप छान आहे दागिने @prajaktarajsaaj आणि सुंदर आहेस तू  अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. तर अजून एकाने कमेंट करत लिहीलंय की, प्राजू कसली गोड दिसतेस तर अजून एकाने लिहीलंय, तुझ्या सारखेच अत्यंत मोहक आणि सुंदर दागिने.. तुझं कौतुक, खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा तर अजून एकाने लिहीलंय की, तुम्ही गळ्यात घातलेली बोरमाळ खुप मस्त आहे आणि कोल्हापूरी साज पण खुप सुंदर आहे किंमत कळेल का? तर अनेकजण तिला तिच्या दागिन्यांची किंमत विचारत आहेत. 


'जुळून येती रेशीमगाठी' पासून सुरू झालेला हा प्रवास 'पांडू', 'पावनखिंड', 'लकडाउन','वाय' सारख्या चित्रपटांवर येऊन ठेपला. त्यामुळे अभिनयासोबतच सध्या अभिनेत्री व्यवसायातही प्रचंड व्यग्र आहे. नुकतेच प्राजक्ताने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. जे चर्चेचा विषय ठरत आहेत.