Pranita Subhash on Stop Patriarchy: प्रणिता सुभाष ही अभिनेत्री तामिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटातील सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे. गेल्यावर्षीच तिचे लग्न झाले असून बंगलोरच्या एका प्रतिष्ठित बिझनेसमन नितीन राजूशी तिने लग्नगाठ बांधली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या प्रणिता सुभाष ही वेगळ्याच एका कारणामुळे चर्चेत आहे. भीमना अमावस्याच्या विधीदरम्यान आपल्या पतीच्या म्हणजेच नितीन राजूच्या पायाजवळ बसून तिने एक फोटो काढला आणि तो इन्टाग्रामवर शेअर केला. या फोटोवर मात्र आता चांगलीच चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावरून या फोटोवर टीका होते आहे आणि प्रणिताला याबाबतीत ट्रोल केले जात आहे. यामुळे प्रणितावर ती पितृसत्ताक वृत्तीचा पुरस्कार करते आहे असे आरोप होत आहेत. या आरोपांना न जुमना प्रणिताने आता आपले वक्तव्यही लोकांपुढे मांडले आहे. 


नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान बोलताना प्रणिताने आपली बाजू मांडली आहे. ती म्हणाली, ''मी लहानपणापासून आपल्या परंपरांना पाळत आले आहे. सोशल मीडियावरील ट्रोलिंगला मी फारसे महत्त्व देत नाही. मी दुर्लक्ष करते. मी अभिनेत्री आहे याचा अर्थ असा नाही की मी विधी पाळणार नाही. ज्यावर माझा विश्वास आहे आणि निष्ठा आहे ती गोष्ट मी आनंदाने करते.''


प्रणिताने 28 जुलै रोजी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 'भीमना अमावस्या' असे कॅप्शन देऊन हा फोटो शेअर केला होता. भीमना अमावस्याचे व्रत अनेक हिंदू स्त्रिया त्यांच्या पती आणि कुटुंबातील इतर पुरुष सदस्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यासाठी पाळतात. ''आपण मॉडर्न झालो म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपण आपले मुळ विसरले पाहिजे. मला नेहमीच मूल्ये, संस्कार आणि कुटुंबाशी संबंधित असलेली कोणतीही गोष्ट मला आवडते. पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली म्हणूनही अनेकांनी माझ्यावर टीका केली पण मी हे मानते की मी कुटुंबातील सर्वच जणांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करते.'', असे परखड मतं तिने व्यक्त केले. 



प्रणिताचे 30 मे 2021 रोजी बंगळुरू येथील उद्योजक नितीन राजू यांच्याशी लग्न केले. त्या दोघांना अर्ना नावाची लहान मुलगीही आहे. 2010 मध्ये तेलुगु  'बावा' चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर अनेक कन्नड आणि तेलुगु चित्रपटांमध्ये काम केलेल्या प्रणिताने 2021 मध्ये आलेल्या 'हंगामा 2' चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.