मुंबई : बेताल वक्तव्य आणि सोशल मीडिवरील पोस्ट पाहता, आयटम गर्ल राखी सावंत ही कायमच चर्चेचा विषय ठरते. इतकंच नव्हे, तर अनेकदा तिची खिल्लीही उडवली जाते. यावेळीसुद्धा राखी पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. तेसुद्धा तिच्या एका जुन्या फोटोमुळं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात सध्याच्या घडीला सुरु असणाऱ्या घडामोडी पाहता राखी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सातत्यानं अनेक पोस्ट करत असते. अभिनेत्री कंगना राणौत हिच्याविषयीसुद्धा ती अनेकदा टीकेचा सूर आळवते. यावेळी मात्र तिलाच २०१९ मध्ये पोस्ट केलेल्या एका फोटोसाठी अनेकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. 


राखीनं साधारण वर्षभरापूर्वी सोशल मीडियावर पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजासोबतचा फोटो पोस्ट केला होता. ज्यासोबत तिनं आपलं भारतावरील प्रेम व्यक्त करत पाकिस्तानच्या ध्वजासोबतचा फोटो पोस्ट का केला, यामागचं कारणही स्पष्ट केलं होतं. त्यावेळीसुद्धा राखीच्या या फोटोवर नानाविध प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या होत्या. 





 


आता पुन्हा एकदा तिच्या या फोटोनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं असून, व्हायरल होण्याच्या सत्रात त्याचाही समावेश झाला आहे. ज्यामध्ये एका युजरनं राखी आणि कंगनाची तुलना केली आहे.  तर, आणखी एका युजरनं पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाच्या रंगाबाबत लिहित राखीच्या या फोटोवर प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं. काही नेटकऱ्यांनी तर थेट राखीनं पाकिस्तानाच राहावं अशी टीकाही केली.