Rakhi Sawant: राखी सावंत आपल्या बेताल वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. आजकाल आपल्या बॉयफ्रेंड आदिल दुरानाहीसह ती सतत चर्चेत राहते. आता पुन्हा एकदा ती आणि तिचा बॉयफ्रेंड आदिल हे चर्चेत आले आहेत. यावेळी ती तिच्या कुठल्या बेताल वक्तव्यांमुळे नाही तर आपल्या बॉयफ्रेंडला आलेल्या धमकीमुळे राखी प्रचंड बैचेन झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राखी सावंत ही एक अशी सेलिब्रिटी आहे जिच्या आयुष्यातला ट्विस्ट संपण्याचे नाव घेत नाही. स्वतःला 'एंटरटेनमेंट क्वीन' म्हणणारी राखी सावंत नेहमीच लोकांचे मनोरंजन करत असते. म्हणूनच ती नेहमीच चर्चेत राहते. पण आता राखीच्या आयुष्यात जे घडले आहे त्याने तर राखीच्या आयुष्यात मोठा भूकंप आणला आहे. सध्या राखी सावंत चांगलीच संतापली आहे कारण तिच्या बॉयफ्रेंडला धमकीचा आलेला मेसेज राखीने स्वतःहून चाहत्यांना दाखवला आहे. 


राखीने आदिलला सोडावे नाहीतर आम्ही आदिलला मारून टाकू असा मेसेज आदिलला आला आहे. तिचं असं म्हणणे आहे की आदिलच्या कोणीतरी एक्सने हे कृत्य केले आहे पण वास्तविक आदिलला आदिल हसन या नावाने धमकी आलेली आहे. ही धमकी पाहून राखी सावंत कसली शांत बसत्येय. तिनेही धमकी देणाऱ्याला चांगलेच खडेबोल सुनावले आहे. राखी सावंतचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे. 


या धमकीवर राखी सावंत रागाने म्हणाली, ''या धमक्या देणे बंद करा, समजून घ्या. माझ्या आदिलला काही झालं तर... आधी मला संपवा. समजले का तूम्हाला? आणि त्याला का मारणार तुम्ही? प्रेम करणं म्हणजे चोरी करणं आहे का? प्रेम करणे गुन्हा आहे का? तुम्ही प्रेम कधी केले नाही का? माझ्या आदिलला काही होऊ देणार नाही मी... तुम्ही सगळे माझे बांधव आहेत तेव्हा मला बहिण माना आणि तूमच्या या बहिणीचे घर बांधा. ते उध्वस्त करू नका.'', अशा परखड शब्दात राखीने धमकी देणाऱ्यांना खडसावून सांगितले आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या प्रकरणामुळे राखीवर सध्या दुःखाचा डोंगर पडला आहे. ती म्हणाली, ''मी आदिलशिवाय राहू शकत नाही. मी आदिलवर खूप प्रेम करते. तो माझा जीव की प्राण आहे आणि आदिलला काही झालं तर मी जगू शकणार नाही. मी खूप दुःखी आहे. माझ्या आदिलला धमक्या येत आहेत. आम्ही तुला मारून टाकू, असे मसेजेज आले आहेत. आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. आम्ही काय चूक केली आहे? तुम्ही आम्हाला धमक्या का देत आहात?,'' अशा शब्दात राखीने स्वतःचे सात्वंन केले आहे.