मुंबई : अभिनेता आणि निर्माता जॅकी भगनानीचा वाढदिवस आहे. या खास प्रसंगी जॅकीची मैत्रीण आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने तिच्यासाठी एक खास पोस्ट केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रकुलने जॅकीचा फोटो शेअर करत लिहिले, हॅपी बर्थडे माय सनशाईन. तु हसत राहा. तुम्हाला हवे ते सर्व मिळवे ही प्रार्थना



चाहत्यांसोबतच सेलेब्स देखील रकुलच्या या पोस्टवर भरपूर कमेंट करत आहेत. तर सोफी चौधरीने कमेंट करत म्हटलंय, हॅपी बर्थडे जॅकी. बाय द वे, मी तुझ्यासाठी काय मागू, तुला यावर्षी खूप गोंडस गिफ्ट मिळालं आहे.



गिफ्ट म्हणजेच रकुल प्रीत असं सोफीचं म्हणणं आहे. यावर्षी रकुल आणि जॅकीने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वीचं आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. रकुलच्या वाढदिवशी दोघांनी त्यांच्या नात्याची घोषणा केली.



जेव्हा रकुलला जॅकीसोबतच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले तेव्हा अभिनेत्री म्हणाली होती की, जेव्हाही ते लग्न करतील तेव्हा त्याबद्दल सर्वांना माहिती देतील. पण सध्या ते त्यांच्या नात्याचा आनंद घेत आहेत.