मुंबई : बॉलिवूड पाठोपाठ आता मराठी सिनेसृष्टीतही अभिनेत्री गोड बातमी देत आहे. नेहा धुपिया आणि सानिया मिर्झा पाठोपाठ या अभिनेत्रीने देखील एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करून दिली माहिती. या अभिनेत्रीने सुरूवातीपासूनच आपल्या डोहाळे जेवणाचे आणि प्रत्येक महिन्याचे फोटो शेअर केल्यामुळे ही अभिनेत्री चर्चेत होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अभिनेत्रीचं नाव आहे रश्मी अनपट. कुलस्वामिनी या मालिकेतील अभिनेत्री रश्मी अनपट प्रेक्षकांच्या पसंतीला पडली. रश्मीने सोशल मीडियावर आपल्या डोहाळे जेवणाचे फोटो शेअर केले आहे. खूप दिवसांपासून ती अभिनयापासून दूर होती याचं अखेर उत्तर मिळालं आहे. 



13 ऑक्टोबर 2018 रोजी रश्मीने या गोंडस बाळाला जन्म दिला आहे. आता महिन्याच्या या बाळाचा फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. मराठी सिनेसृष्टीत सगळीकडे आनंद साजरा केला जात आहे.  रश्मीने अभिनेता अमित खेडेकरशी लग्न केलं आहे. अमितने हृदयांतर या सिनेमात काम केलं आहे. या तिच्या फोटोला तिच्या चाहत्यांकडून प्रचंड लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेकांनी कमेंटद्वारे त्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत.