तरुणांच्या काळजाचा ठोका चुकवणारी अभिनेत्री आली व्हील चेअरवर! दिलेयत सर्वाधिक हीट चित्रपट
सोशल मिडीयावर सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सोशल मिडीयावर आपल्या एक्स-रे रिपोर्टचा फोटो शेअर केला. यामध्ये तिला चालता येल नसल्याचं स्पष्ट झालं आहे. नेमकी कोण आहे `ही` अभिनेत्री?
Famous Actress: नुकतीच, सोशल मिडीयावर एका अभिनेत्रीच्या शेअर केलेल्या फोटोची चर्चा रंगत आहे. या अभिनेत्रीने सोशल मिडीयावर आपल्या एक्स-रे रिपोर्टचा फोटो शेअर केला. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या फोटोमुळे चाहते थक्क झाले आहेत. ही अभिनेत्री केवळ 28 वर्षांचीच आहे. मात्र, तिने शोअर केलेल्या फोटोमधील रिपोर्ट्सवरुन तिला आता चालता सुद्धा येत नसल्याचं स्पष्ट होत आहे. तिच्या शरीराची तीन हाडे तुटल्याचं या रिपोर्टमधून समोर आलं. खरंतर, या अभिनेत्रीने मागील वर्षीच सर्वाधिक हीट चित्रपट दिला होता. नेमकी कोण आहे ही अभिनेत्री? जाणून घेऊया.
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून दक्षिणात्य चित्रपट आणि आता बॉलिवूडमध्ये देखील आपला ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना आहे. नुकतंच, रश्मिकाने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओ मध्ये ती 'छावा' चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचच्या कार्यक्रमासाठी तयार होताना दिसली. या व्हिडीओ मध्ये रश्मिका ही लाल रंगाच्या ड्रेस मध्ये तसेच व्हील चेअरवर दिसली. यासोबतच, 'छावा' या चित्रपटाचा ट्रेलरसुद्धा दाखवण्यात आला. तिच्या 'छावा' या चित्रपटातील लुकला प्रेक्षकांची आणि चाहत्यांच्या पसंतीचा ठरला आहे.
3 फ्रॅक्चर
याच पोस्टमध्ये रश्मिकाने आपल्या पायाच्या एक्स रेच्या रिपोर्टचा फोटो शेअर केला. तिच्या या पोस्टमधील रिपोर्टमध्ये तिच्या पायाचे हाड हे तील जागी तुटल्याचं तिने लिहिलं. एक्स-रे रिपोर्टसोबतच एक व्हिडीओही रश्मिकाने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रश्मिकाची मैत्रिण तिच्या प्लास्टरवर डिझाईन बनवत असताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत रश्मिकाने लिहिले, "माझ्या मैत्रिणीने बाहेरुन खूप सुंदर डिझाइन काढले आहे, मात्र त्याच्या आतील तीन हाडे तुटलेली आहेत."
चाहत्यांना दिली फ्लाइंग किस
या पोस्टमध्ये रश्मिकाने शेवटी आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ मध्ये रश्मिका ही चाहत्यांना फ्लाइंग किस देताना दिसत आहे. या सोबतच गेले दोन दिवस तिने जमिनीवर पाय ठेवला नसल्याचं सुद्धा सांगितलं. "तुम्ही सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. लहान गोष्ट सुद्धा अजिबात हलक्यात घेऊ नका. माझं खूप सारं प्रेम तुमच्यासोबत आहे." असं देखील ती व्हिडीओ पोस्ट करताना म्हणाली.
हे ही वाचा: Coldplay Concert : ...अन् क्रिस मार्टिननं हजारोंच्या गर्दीसमोर गायलं 'वंदे मातरम', 'मां तुझे सलाम'; पाहा Video
2024 मधील सर्वाधिक हीट चित्रपट
रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जूनचा 'पूष्पा 2' हा चित्रपट मागील वर्षीच प्रदर्शित झाला. सर्व हीट चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत 'पूष्पा 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरील सर्वाधिक हीट चित्रपट ठरला. गडगंज कमाई करणारा हा चित्रपट भारतातील दुसरा सर्वाधिक ग्रॉसिंग चित्रपट बनला. जगभरात 1 हजार 831 कोटींची कमाई करुन या चित्रपटाने 'बाहुबली 2' चा 1 हजार 810 कोटींचा रेकॉर्ड मोडला.