अभिनेत्री रश्मिका मंदान्ना देतेय `या` आजाराशी झुंज? फोटो पाहून चाहते हैराण
रश्मिका मंदान्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मुंबई : दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सध्या तिच्या गुडबाय चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. अभिनेत्री नुकतीच मुंबईत स्पॉट झाली. जिथे अभिनेत्री निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, यावेळी रश्मिका मंदान्नाला पाहून चाहते खूपच आश्चर्यचकित झाले. या फोटोंमध्ये अभिनेत्री पूर्वीपेक्षा खूपच बारीक झाल्याचं दिसत आहे. अभिनेत्रीचे हे फोटोज इंटरनेटच्या दुनियेत मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
रश्मिका मंदान्ना निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली
यावेळी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
रश्मिका मंदान्ना खूपच अशक्त दिसत होती
या फोटोंमध्ये रश्मिका मंदान्ना खूपच कमकुवत दिसत आहे. रश्मिका मंदान्नाची हे फोटो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
रश्मिका मंदान्नाने खाणे-पिणं सोडलं?
अभिनेत्री रश्मिका मंदान्ना ही खूप फिटनेस फ्रीक आहे. ती रोज जिमला जाते. पण हे फोटो पाहून एका यूजरने कमेंट करत 'ती नीट खात नाहीये का' असं लिहिलं.
रश्मिका मंदान्ना खरंच आजारी आहे का?
तर एका युजरने कमेंट करत लिहिलं की, अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आजारी आहे. कारण या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच बारिक दिसत आहे.
रश्मिका मंदान्नाचा बदललेला लूक पाहून चाहते नाराज
रश्मिका मंदान्नाचा हा लूक चाहत्यांना अधिकच हैराण आणि अस्वस्थ करत आहे. या फोटोंनी इंटरनेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे.
रश्मिका मंदान्नाने डेनिम स्कर्टसह लूक पूर्ण केला
गुडबायच्या प्रमोशनमध्ये अभिनेत्री रश्मिका मंदान्ना अगदी वेगळ्या अंदाजात दिसली. या फोटोंमध्ये अभिनेत्री डेनिम स्कर्टमध्ये दिसली होती.