मुंबई : 'एक्स्प्रेशन्स क्वीन' म्हणा, किंवा मग 'नॅशनल क्रश'. अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या नावाआधी आता कोणतीही ओळख सांगण्याची गरज भासत नाही. कारण, रश्मिकाचं नावच पुरेसं असतं. दाक्षिणात्य कलाजगतातून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणारी रश्मिका आता तिच्या लोकप्रियतेत भर टाकताना दिसत आहे. (Rashmika Mandanna)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विविधभाषी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या याच रश्मिकानं फार कमी वयातच मोठं यश संपादन केलं. 'पुष्पा'मुळे ती देश आणि परदेशातील प्रेक्षकांच्या मनात पोहोचली. 


एका चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर रश्मिकानं पुन्हा तिचा मोर्चा कामाकडे वळवला आणि तितक्यातच तिचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ वारंवार पाहिला जाऊ लागला. 


एक अभिनेत्री म्हणूनच नव्हे, तर एक व्यक्ती म्हणूनही रश्मिका किती उत्तम आहे हेच या व्हि़डीओमध्ये दिसत आहे. विरल भयानीच्या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. (Actress rashmika mandanna stops bodygaurd allows fan to click the photo)


व्हिडीओमध्ये रश्मिका कोणा एके ठिकाणहून बाहेर येताच तिथं असणारे छायाचित्रकार तिचे फोटो काढताना दिसत आहेत. त्यांच्याकडे पाहत कुतूहलानं, तुम्ही या फोटोंचं काय करणार असं ती विचारताना दिसते. 


तितक्यातच काही चाहते तिथं येऊन रश्मिकासोबत फोटो काढण्यास सुरुवात करतात. तीसुद्धा फोटोसाठी पोझ देते. पण, चाहत्यांची गर्दी वाढत असल्याचं पाहून रश्मिकाचे बॉडीगार्ड मात्र तिथं त्यांना अडवण्यासाठी येतात. 



रश्मिका मात्र त्या क्षणी तिच्या बॉडीगार्डला थांबवत चाहत्यांना फोटो काढण्याची परवानगी देते. एक अभिनेत्री असण्यासोबतच तिचं मनही तितकंच मोठं आहे हेच या कृतीतून लक्षात येत आहे. काय मग, तिचं हे रुप तुम्हाला कसं वाटलं?