मुंबई : बॉलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनला मोठ्या पडद्यावर 27 वर्षे पूर्ण झाले आहेत. रवीनाने 1991 ने 'पत्थर के फूल' या हिंदी सिनेमातून पदार्पण केलं. यामध्ये ती सलमान खानसोबत दिसली. आतापर्यंत तिने 100 सिनेमांमध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या. तिच्या अनेक भूमिका अजरामर झाल्या पण एक रेप सीन तिच्या आयुष्यभर लक्षात राहिलायं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुलै 2017 मध्ये तिचा शब हा सिनेमा रिलीज झाला होता. पण बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने काही कमाल केली नाही. याआधी एप्रिल 2017 मध्ये तिने 'मातृ' सिनेमात दमदार भूमिका केली होती. पण या सिनेमादरम्यान रेप सीन करताना ती हैराण झाली होती.


रात्रभर रडली 


तसं पाहायला गेलं तर रेप सीन देणं हे एक सिनेमाचा भाग होता. पण तिच्यासाठी हा सीन खूप कठीण गेला. कारण जेवढं दर्शकांना वाटत तेवढा रेप सीन शूट करणं सोपं नसतं. असे सीन करताना बऱ्याचदा अभिनेता- अभिनेत्रींना घाम फुटतो. या सीनची इंडस्ट्रीतही जास्त चर्चा झाली. समाजात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना या सिनेमातून वाचा फोडण्यात आली.  या सिनेमात बरेच रेप सीन होते. 'यातील काहीतर एवढे भयावह होते की अंगावर काटे उभे राहिले', असं रवीना सांगते. हा सिनेमा पुन्हा डब करायला घेतला तेव्हा तर ती अजूनच हैराण झाली. कित्येक रात्री तिने अक्षरश: रडत रडत काढल्या.


अनेक भाषांत काम 


रवीना आता 43 वर्षांची झालीयं. तिला 'पत्थर के फूल' या पहिल्या सिनेमासाठी फिल्मफेयर मिळालाय तिला न्यू फेस ऑफ द इयर' म्हणूनही निवडलं गेलं. हिंदी सिनेमांसोबतच तिने तामिळ, तेलगू, कन्नड अशा अनेक भाषांत काम केलंय.