मुंबई :  पाचव्या यश चोप्रा मेमोरीअल पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त करुन मन मोकळे केले. यावेळी गायिका आशा भोसलेही उपस्थित होत्या. (व्हिडिओ बातमीच्या खाली पाहा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पुरस्काराच्यावेळी रेखा यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त करताना सांगितले, मी मंगेशकर कुटुंबीयांची आभारी आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. त्यावेळी त्यांनी मनातील सलही व्यक्त केली. मी ज्याच्यावर प्रेम करते, त्याच्यापासून मी खूप दूर जाते. मी ज्यांच्यावर प्रेम करते ते माझ्यापासून खूप दूर जातात, तसेच ज्यांच्यावर खूप प्रेम करते ते मलाच सोडून जातात. किंवा जगच मला त्यांच्यापासून दूर करतात.



दरम्यान, 'यश चोप्रा' या पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या दिग्गज गायिका आशा भोसले यांना गौरविण्यात आले. ८४ वर्षीय आशा भोसलेंना बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखाच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आशा भोसले यांनी चित्रपटसृष्टीतील ६० दशकांच्या आठवणींनी उजाळा दिला. त्याचबरोबर यश चोप्रा यांच्यासोबत झालेल्या पहिल्या भेटीच्या आठवणीही जागवल्या.


रेखा यांच्या मनातील भावना