मुंबई : अभिनेत्री रिंकू राजगुरू म्हणजेच सर्वांची लाडकी आर्ची  'सैराट' चित्रपटाच्या माध्यमातून ती एका रत्रीत प्राकाशझोतात आली. 'सौराट' चित्रपटातच्या यशानंतर तिने कधीचं मागे वळून पाहिलं नाही. रिंकू कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असते. एवढंच नाही  तर आर्ची तिच्या खासगी आयुष्यातील गोष्टी आणि तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगत असते. सध्या रिंकूने पोस्ट केलेले काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे फोटो पाहून युजर्स रिंकूने गुपचूप लग्नगाठ बांधली अशी अटकळ बांधत आहेत. आणि ही अटकळ बांधली जातेय रिंकूचा लूक पाहून. शेअर केलेल्या फोटोंमध्ये रिंकू जांभळ्या रंगाच्या नऊवारीमध्ये दिसत आहे. या बरोबर तिने हेव्ही गोल्डन ज्वेलरी परिधान केली आहे. गळ्यात नेकलेस, हातात हिरव्या बांगड्या, कपाळावर लाल टिकली, नाकात नथ, पायात पैजण असा हा रिंकूचा लूक चाहत्यांना घायाळ करतोय. 



रिंकूच्या हातातील हिरव्या बांगड्या पाहून रिंकूने लग्नगाठ बांधली असावी अशी अटकळ बांधली जातेय. पण हा लूक अभिनेत्रीने फोटोशूटसाठी केला आहे. हे फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे का, उदासियों की इतनी तलब अच्छी नहीं है, मुस्कुराए जनाब ये ज़िंदगी आपकी ही है.. साडीमध्ये रिंकू प्रचंड सुंदर दिसत आहे. चाहत्यांना देखील अर्चीचा हा लूक प्रचंड आवडला आहे.  सध्या सर्वत्र फक्त रिंकूच्या पारंपरिक लूकची चर्चा आहे.