मुंबई : 'सैराट' या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत एक अमूलाग्र बदल केला. सिनेमा हा फक्त पुरूषप्रधान नसून तो स्त्री प्रधान देखील असतो हे या सिनेमाला दाखवून दिलं.  आणि


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत अभिनेत्रीची चालत आलेली व्याख्या बदलून रिंकू राजगुरू सारखी अभिनेत्री जगासमोर उभी केली. सिनेमाच्या भरघोस यशानंतर आपण पाहिलंच की रिंकू राजगुरूचं किती कौतुक झालं. अवघ्या वयाच्या १६ व्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार विजेती ठरली. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना रिंकूने आपली एक वेगळी ओळख या सिनेसृष्टीत केली. आणि आता ती तिची ओळख तेलगू सिनेमातही दाखवत आहे. सैराटनंतर रिंकूला जे यश मिळालं त्याचं सर्वच स्तरावरून कौतुक झालं. तिच्या या यशामागे खंबीर होते तिचे आई-बाबा. 


शिक्षकी पेशा असलेले तिचे आई-बाबा रिंकूच्या या सिने करिअरमध्ये तिच्या सोबत खंबीर उभे राहिले. आता हे दोघे देखील आपली कला सादर करणार आहेत. रिंकू पाठोपाठ तिचे आई बाबा आपल्याला मराठी सिनेमांत दिसणार आहेत. 


सिनेमात हे पाहायला मिळू शकतं? 


 रिंकूची आई आशा राजगुरू आणि वडील महादेव राजगुरू प्रेक्षकांना या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा आहे 'एक मराठा लाख मराठा'. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून एकच भडका पेटला. आणि एक मराठा लाख मराठा म्हणत सर्व मराठे एकत्र आले. याच विषयावर हा सिनेमा आधारित आहे. या सिनेमाबद्दल आणखी काही माहिती अद्याप मिळालेली नाही. पण हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


एक मराठा लाख मराठा हे ब्रीद वाक्य घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नागरिक रस्त्यावर उतरले. मराठा आरक्षण आणि कोपर्डी हत्याकांडातील आरोपींना शिक्षा असे दोन महत्वाचे मुद्दे यामध्ये होते. तर यातील कोणता मुद्दा घेऊन हा सिनेमा तयार करण्ण्यात आला आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.