मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध व्यवसायिक राज कुंद्राला काल रात्री अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर अश्ली-ल चित्रपट बनवण्याचा आणि काही अ‍ॅप्सवर अपलोड केल्याचा आरोप आहे.असं सांगितले जात आहे की, त्याचवेळी, अटकेनंतर अभिनेत्री आणि मॉडेल सागरिका शोना सुमन यांचं विधान पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. ज्यामध्ये त्यांनी राज कुंद्रावर अनेक आरोप केले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सागरिकाचे राज कुंद्रावर गंभीर आरोप 
यावर्षी फेब्रुवारीमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यामध्ये सागरिकाने असा आरोप केला आहे की, आपल्याला व्हिडिओ कॉलद्वारे वेब सीरिजसाठी ऑडिशन देण्यास सांगण्यात आलं होतं. ज्यासाठी तीन जणांनी तिच्याकडे न्यूड ऑडिशनची मागणी केली होती. त्यातील एक होता राज कुंद्रा.


'राज कुंद्राच्या वेब सिरीजसाठी मला ऑफर मिळाली'
व्हिडिओमध्ये सागरिकाने असा दावाही केला आहे की, 'मी एक मॉडेल आहे आणि मी 3-4-. वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. मी जास्त काम केलं नाही. लॉकडाऊन दरम्यान काही गोष्टी मला शेअर करायच्या आहेत. ऑगस्ट २०२० मध्ये मला उमेश कामत जींचा फोन आला, त्यांनी मला राज कुंद्राच्या वेब सिरीजमध्ये काम करण्याची ऑफर दिली. तेवढ्यात मला कळालं की तो शिल्पा शेट्टीचा नवरा आहे.



'राज कुंद्राने मला न्यूड ऑडिशनसाठी विचारलं'
सागरिकाने सांगितलं की, राजने मला सांगितलं की, मी त्यात काम करत राहिल्यास मला पुढेही काम मिळेल. म्हणून मी या कामाला हो म्हणाले. मग मी त्यांना विचारलं की, कोविड काळात मी ऑडिशन कसं देऊ शकतो. त्यांनी मला व्हिडीओ कॉलद्वारे ऑडिशन घेतलं जाईल असं त्यांनी सांगितलं. जेव्हा त्यांनी माझ्याकडून न्यूड ऑडिशनची मागणी केली. तेव्हा त्यांचं हे  शब्द ऐकून मला आश्चर्य वाटलं.व्हिडिओ कॉलमध्ये तीन लोक होती. ज्यापैकी एकाने आपला चेहरा झाकला होता आणि त्यापैकी एक राज कुंद्रा होता. मला अशी इच्छा आहे की जर ते अशा गोष्टींमध्ये सामिल असतील तर त्यांना अटक केली जावी आणि अशा प्रकारचे रॅकेट उघडकीस आलं पाहिजे.


मुंबई पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात उमेशला केली अटक 
महत्त्वाचं म्हणजे उमेश कामतने यापूर्वी कुंद्राच्या कंपनीत काम केलं होतं. आणि यावर्षी 9 फेब्रुवारीला त्याला मुंबई पोलिसांनी एका अश्लील रॅकेटच्या आरोपाखाली अटक केली होती. अभिनेत्री गेहना वशिष्ठच्या अटकेनंतर त्याचं नाव समोर आलं होतं.