मुंबई : दाक्षिणात्य सिनेजगतामध्ये अतिशय लोकप्रिय असणारी जोडी, समंथा रुथप्रभू (Samantha Ruth Prabhu ) आणि अभिनेता नाग चैतन्य (Naga Chaitanya) यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच समंथानं आपल्य़ा नावातून नाग चैतन्यचं आडनाव कमी केलं आणि त्याबाबतच्या चर्चांनी अधिक जोर धरला. सध्या म्हणे हे दोघंही एकमेकांपासून विभक्त राहत असून येत्या काळात त्यांच्या घटस्फोटाची अधिकृत घोषणाही केली जाणार आहे. या साऱ्यामध्येच आचा चर्चा सुरु आहे ती म्हणजे नाग चैतन्यच्या 'लव्ह स्टोरी'ची. 


नाग चैतन्यच्या या लव्ह स्टोरीवर खुद्द समंथाही व्यक्त झाली. विनर... असं म्हणत तिनं यावर प्रतिक्रिया दिली. घटस्फोटाच्या चर्चा सुरु असतानाच ती अशी प्रतिक्रिया कशी देऊ शकते, असाच प्रश्न तुम्हालाही पडला ना? 


तर, समंथा नाग चैतन्यच्या खऱ्याखुऱ्या लव्ह स्टोरीवर नव्हे, तर त्याच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरवर व्यक्त झाली आहे. 'लव्ह स्टोरी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर समंथानं तो आपल्याला आवडला असल्याची प्रतिक्रिया दिली. 


सर्वात मोठ्या सेलिब्रिटी कुटुंबात वादळ; मुलगा- सून विभक्त, घटस्फोटाच्या तयारीत?




नाग चैतन्य आणि साई पल्लवी या दोघांच्याही मध्यवर्ती भूमिका असणारा हा चित्रपट 24 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रेक्षकांमध्येही या चित्रपटासाठीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. पण, या साऱ्यामध्येच समंथा आणि नाग चैतन्य यांच्या नात्याबाबतही अनेकांनीच चिंता व्यक्त केली आहे.