मुंबई : बिग बॉस 13 फेम Shahnaz Gill पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. खरंतर शहनाज गिलच्या आयुष्यात एका खास व्यक्तीने  एंट्री घेतली आहे. शहनाजच्या चाहत्यांसाठी ही बातमी आनंदाच्या बातमीपेक्षा कमी नाही. सिद्धार्थ गेल्यानंतर शहनाज गिल एकटी पडली आहे. अशा परिस्थितीत तिच्या आयुष्यातील या नव्या प्रेमाची बातमी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ठरत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या सर्वांना माहित आहे की, बिग बॉस 13 मध्ये शहनाज गिल दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या प्रेमात पडली होती. बातम्यांनुसार, दोघंही लग्न करणार होते पण अभिनेत्याच्या मृत्यूने सर्व काही बदललं. मात्र अभिनेत्री पुन्हा एकदा प्रेमात पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत.


राघव जुयालला dating करत आहे
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शहनाज सध्या सुप्रसिद्ध कोरिओग्राफर Raghav juyal ला डेट करत आहे. आता दोघंही मैत्रीच्या पुढे गेले आहेत. रिपोर्ट्सनुसार, दोघंही एकमेकांना खूप पसंत करू लागले आहेत. शहनाज आणि राघव एकत्र ऋषिकेशलाही गेल्याचं वृत्त आहे. त्याच्या ऋषिकेशची बातमी किती खरी आणि किती खोटी हे फक्त शहनाज आणि राघवलाच माहिती.


Salman Kha च्या चित्रपटाच्या सेटवर भेट
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शहनाज गिल आणि राघव यांची पहिली भेट Salman Kha च्या 'कभी ईद कभी दिवाळी' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. सलमान खानच्या चित्रपटात राघव मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राघव आणि शहनाज यांच्यात सेटवर भेट झाली होती, तर आता त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं आहे.



शहनाज गिल आणि सिद्धार्थची जोडी चांगलीच पसंतीस उतरली होती. Sidharth Shukla च्या जाण्यानंतर शहनाजला या धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी बराच वेळ लागला आहे. या दरम्यान अभिनेत्रीने स्वतःला व्यस्त ठेवलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थच्या जाण्यानंतर शहनाज गिल वर्कहोलिक झाली आहे. ती तिच्या करिअरवर जास्त लक्ष देत आहे. लवकरच ही अभिनेत्री सलमान खानच्या चित्रपटातून पदार्पण करणार आहे.