मुंबई : कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. बरेच सिनेस्टार कोरोनाच्या जाळ्यात सापडत आहेत. करिना कपूर खान, अर्जून कपूर, नोरा फतेहीसारखे मोठे सेलेब्सनंतर आता शिल्पा शिरोडकरदेखील कोरोना पॉझिटीव्ह आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिल्पा शिरोडकरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह
शिल्पा शिरोडकरने आपल्या इंस्टाग्रावर पोस्टमधून कोरोनाचे साईड ईफेक्ट होण्याची माहिती दिली आहे. शिल्पाने आपल्या पोस्टमध्ये सांगितलं की, ४ दिवसांआधी तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.  शिल्पा अशी इंडियन एक्ट्रेस आहे की, जिने सगळ्यात पहिली  कोविड वॅक्सिन घेतली आहे. तिने जानेवारीमध्ये कोरोना वॅक्सिन घेतली होती. 


शिल्पाने फँन्सला केली काळजी घेण्याची विनंती
शिल्पाने आपल्या पोस्टमध्ये फँन्सला सुरक्षित  राहण्याची आणि वॅक्सिन घेण्याचा सल्ला दिला आहे. शिल्पाने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, तुम्ही सगळे सुरक्षित रहा. सगळ्या नियमांचं पालन करा  आपल्या सरकारला माहित आहे की, आपल्यासाठी काय बेस्ट आहे. खूप सारं प्रेम.''



शिल्पाआधी बॉलिवूड अभिनेता अर्जून कपूर आणि त्याची बहिण अंशूला कपूरदेखील कोरोना पॉझिटीव्ह आले होते.  रिया कूपर आणि तिचे पती करण बूलानी देखील कोरोना पॉझिटिव्ह आले होते. बॉलिवूडचे बरेच सेलिब्रिटी कोरोनाच्या जाळ्यात सापडत आहेत.