`बाथरूममध्ये जाऊन...`, अनेक दिवसांनंतर दिग्दर्शकाची पोलखोल, अभिनेत्रीने सांगितला `तो` कटु अनुभव, वाचा नेमकं प्रकरण
बॉलीवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकांवर एका अभिनेत्रीने आपला त्यांच्यासोबतचा काम केल्याचा वाईट अनुभव शेअर केला आहे.
Shiny Doshi On Director Sanjay Leela Bhansali: बॉलीवूडमध्ये कधी काय घडेल याचा काही नेम नाही. कुणावर कधी कुठल्या गोष्टीवरून कसला निशाणा लागेल याचाही काही नेम नाही. बॉलीवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत एका अभिनेत्रीने आपला त्यांच्यासोबतचा काम करतानाचा वाईट अनुभव शेअर केला आहे.
संजय लीला भन्साळी हे बॉलीवूड जगतातील एक मोठं नावं आहे. त्यांनी आजतागायत सर्वात बिग बजेट फिल्म्स केल्या आहेत. अगदी 'देवदास'पासून ते आत्ताच्या 'गंगुबाई काठियावाडी'पर्यंत त्याच्या सिनेमातील भव्य सेट आणि मंत्रमुग्ध करणारे संगीत पाहून प्रेक्षकांनी त्यांच्या चित्रपटांना भरभरून गर्दी केली आहे. मध्यंतरी त्यांचे चित्रपट हे वादाच्या भोवऱ्यातही सापडले होते.
नुकत्याच एका टेलिव्हिजन अभिनेत्रीने संजय लीला भन्साळींसोबतचा एक कटु अनुभव सांगितला आहे. शायनी दोशी या अभिनेत्रीने हा आपला अनुभव शेअर केला आहे. अलीकडेच एका मुलाखतीत शायनीने बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत 'सरस्वतीचंद्र' या टीव्ही शोच्या शूटिंगच्या दरम्यानचे काही कटु अनुभव सांगितले आहेत.
शायनी दोशीने मुलाखतीत खुलासा केला की संजय लीला भन्साळी जवळजवळ दररोज तिला शिव्या देत होते या त्रासामुळे शो सोडण्याचीही वेळ तिच्यावर आली होती. शायनीने सांगितले की, 'मी 2012 मध्ये 'सरस्वतीचंद्र'चा पायलट एपिसोड शूट केला होता. तेव्हा मला अभिनयातले काहीच माहीत नव्हते. त्यामुळे माझे दिग्दर्शक माझ्यावर ओरडायचे. हे माझ्यासाठी खूप लाजिरवाणं होतं. मी शिव्या खालल्या आहेत आणि वॉशरूममध्ये जाऊन खूप रडले आहे.
2013 मध्ये शायनी दोशीने संजय लीला भन्साळीच्या टीव्ही शो 'सरस्वतीचंद्र'मधून टेलिव्हिजनवर पदार्पण केले. या शोनंतर तिने 'सरोजिनी - एक नई पहल', 'जमाई राजा' आणि 'श्रीमद भागवत महापुराण' सारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले. याशिवाय शायनीने 'खतरों के खिलाडी 8' मध्येही भाग घेतला होता. सध्या शायनी स्टार प्लसच्या शो 'पंड्या स्टोर'मध्ये ती मध्यवर्ती भुमिका करते आहे.