मुंबई : कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळं अनेक निर्बंध लागले, त्यामध्ये बरीच कामं ठप्प झाली. दरम्यानच्या काळात अनेकांनीच आपल्या कुटुंबाला, घराला, नात्यांना वेळ दिला. दुसऱ्या लाटेतगही चित्र वेगळं नव्हतं आणि आता तिसऱ्या लाटेतरी हीच पुनरावृत्ती होताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमीअधिक प्रमाणात निर्बंध सुरुच असल्यामुळं सध्या अनेकजण पुन्हा घरात जास्तीत जास्त वेळ व्यतीत करताना दिसत आहेत. 


आपली लाडकी कलाकार मंडळीही यातून वेगळी नाहीत. 


कामासोबतच कायम कुटुंबालाही प्राधान्य देणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीसुद्धा सध्या घरात काही निवांत क्षणांचा अनुभव घेताना दिसत आहे. 


या साऱ्यामध्ये मात्र आता म्हणे सोनाली एका वेगळ्या कारकिर्दीसाठी इतरांकडे काम मागत आहे. 


दोगे ना काम मुझे, असंच ती सर्वांना विचारत आहे. हे आम्ही नाही खुद्द सोनालीच म्हणतेय. 


सोशल मीडियावर तिनं नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. जिथं ती स्वयंपाकघरात काम करताना दिसत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Sonali Kulkarni (@sonalikul)


काही नाही तर किमान पावभाजीच्या गाडीवर तरी मला काम मिळेल, कारण मी उत्तम कांदा कापते असं ती म्हणताना दिसत आहे. 


पुढे दोगे ना मुझे काम? असा प्रश्नही सोनाली विचारताना दिसत आहे. सोनालीनं अतिशय विनोदी अंदाजात तिचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 


तिच्या व्हिड़ीओवर चाहत्यांनीही धमाल कमेंट केल्या आहेत. 'मॅडम मला कांदा लिंबू भाजी सर्वकाही कापता येतं, मला तुमच्यासोबत काम करायचंय.. 'असं एका युजरने लिहिलं. 


तर, कोणी इथंही तिची प्रशंसा करत तुमचा आवाज किती सुरेख आहे, तुम्ही किती छान बोलता असं म्हणत अभिनेत्रीचं इथंही कौतुक केलं.