Maheep Kapoor Instagram Story: बॉलीवूडचे जोडपे सोनम कपूर आणि आनंद (Sonam Kapoor and Anand Ahuja) आहुजा नुकतेच एका मुलाचे पालक झाले आहेत. त्यांनी त्यांच्या मुलाचं नावं वायू असं ठेवलं आहे त्यांचा मुलगा आता महिन्याचा झाला असून 20 सप्टेंबर रोजी सोनम आणि आनंदने मुलाचा एक महिन्याचा वाढदिवस साजरा केला. यासोबतच नामकरण सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते. (actress sonam kapoor and anand ahuja son new room photo is shared by sanjay kapoors wife maheep kapoor)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनमनं सोशल मीडियावर अतिशय गोंडस फॅमिली फोटो शेअर करताना मुलाचे नाव वायु आहुजा असल्याचे सांगितले. सोनम आणि आनंदने आपल्या मुलाचा एक गोंडस फोटोही शेअर केला आहे. 


आता संजय कपूरची पत्नी महीप कपूरने सोनम-आनंदचा मुलगा वायुच्या खोलीची झलक दाखवली आहे. चित्रात एक लाकडी दरवाजा दिसत आहे, ज्यावर अनेक खेळणी जोडलेली आहेत. दरवाजाच्या दोन्ही बाजूला दोन मोठे आरसेही दिसतायत. फोटो शेअर करताना महीपने लिहिले, "वायू कपूर आहुजा रूम #socute."


सोनमने गेल्या महिन्यात 20 ऑगस्ट रोजी मुंबईत मुलाला जन्म दिला. तिने गरोदरपणाचा बराच काळ आनंदसोबत लंडनमध्ये घालवला. 



मुलाच्या नावाची घोषणा होताच सोनमने एक अतिशय क्यूट फॅमिली फोटोही शेअर केला आहे. यामध्ये सोनम, आनंद आणि वायु हे तिघेही पिवळ्या रंगाच्या पारंपरिक ड्रेसमध्ये दिसले. सोनम त्याच्या लहान मुलासाठी खास केक पण ऑर्डर केला होता. त्याचा फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलं आहे.