नवी दिल्ली : अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूंचं गुढ वाढल आहे. कार्डियॅक अरेस्टमुळे हा मृत्यू झाल्याचे आतापर्यंत सांगण्यात येतं आहे. दारूच्या नशेत श्रीदेवी बाथटबमध्ये पडल्याचे समोर आले आहे.


बाथटबमध्ये बुडून मृत्यू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खलीज टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार श्रीदेवींचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाला आहे. फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मृत्यू बुडून झाल्याचा दावा खलीज टाईम्सनं केला आहे. श्रीदेवी यांच्या रक्तामध्ये दारूचा अंशही आढळून आला आहे.


म्हणून श्रीदेवीच्या पार्थिवाचं पोस्टमॉर्टम


दुबई हे युएईमधलं प्रमुख शहर आहे. इथल्या कायद्यानुसार कोणत्याही परदेशी व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला तर मृत्यूचं कारण पोस्टमॉर्टम करून केलं जातं.


पोस्टमॉर्टम आणि फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होतं. त्यानंतर ही कागदपत्रं पोलिसांकडे दिली जातात आणि मग पोलीस मृत्यूच्या कारणावर शिक्कामोर्तब करतात.


हा रिपोर्ट पोलीस मृत व्यक्ती ज्या देशाची आहे तिथल्या दुतावासाला देतात. यानंतर दूतावास मृत व्यक्तीचा पासपोर्ट रद्द करतं आणि नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (एनओसी) देतं. यानंतर पार्थिव नातेवाईकांकडे सोपवलं जातं.


श्रीदेवीला असा हवा शेवटचा प्रवास


श्रीदेवी यांना पांढरा रंग प्रचंड आवडतो. त्यांनी अनेक सिनेमांत पांढऱ्या रंगाचे कपडे घातले आहे. श्रीदेवी यांनी आपल्या कुटुंबियांना माहिती दिली होती की, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अंतिम संस्कारात त्यांना पांढऱ्या रंगाच्या फुलांनी सजवावे असे त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना सांगितले होते.


त्यामुळे त्यांची ही शेवटची इच्छा पूर्ण करण्याचे त्यांच्या कुटुंबियांनी ठरवले आहे. श्रीदेवी यांचे पार्थिव पांढऱ्या मोगरा आणि गुलाबाच्या फुलांनी सजवले जाणार आहे.


अनेकदा श्रीदेवी यांना आपण सफेद रंगाच्या कपड्यांमध्ये पाहिलं होतं. त्यावरून आपल्याला अंदाज होताच की त्यांना तो रंग किती आवडत होता. श्रीदेवी यांचा 54 व्या वर्षी आकस्मिक मृत्यू झाला. कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचे निधन झाले.


बोनी कपुर, खुशी कपूरचा जबाब


या प्रकरणाला आता वेगळ वळणं लागले आहे. बाथटबमधील पाण्यात बुडून श्रीदेवीचा मृत्यू झाल्याचे समोर आल्याने कार्डियॅक अरेस्टच्या बातम्यांना पूर्णविराम मिळाला आहे.


श्रीदेवीच्या शरीरात दारूचा अंश सापडल्याचेही समोर आले आहे. दुबई पोलीस यासंदर्भात अधिक चौकशी करत आहेत.


बोनी कपुर, खुशी कपूरचा जबाब नोंदवला जाणार आहे. यामध्ये आता काय नवी माहिती मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.