Juila Mone in Baipan Bhari Deva: सध्या 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट चांगलाच चर्चेत आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या ट्रेलरला चांगला रिपोन्स मिळाला आहे. या चित्रपटाची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. सहा बहिणींची कथा आपल्याला या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. मंगळागौरच्या निमित्तानं या सहा बहिणी एकत्र येतात आणि या मंगळागौरसाठी सहभागी होतात. सध्या हा ट्रेलर सगळीकडेच व्हायरल झाला आहे. 30 जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सगळ्यांनाच या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. हा चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतो आहे याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. चित्रपटातून तुम्हाला दिग्गज कलाकारांची भट्टी पाहायला मिळणार आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की या चित्रपटातून एका दिग्गज कलाकार दाम्पत्याची मुलगी पदार्पण करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटातून रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, दीपा चौधरी प्रमुख भुमिकेतून दिसणार आहेत. यासोबतच शरद पोंक्षे, पीयूष रानडे हे सुद्धा या चित्रपटातून दिसणार आहेत. याशिवायही अन्य तगडी स्टारकास्ट या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. या ट्रेलरमध्ये तुम्ही पाहू शकता की एक सहा मुली या झोपाळ्यावर बसलेल्या दिसत आहेत.


हेही वाचा - राखी सावंत Kiss प्रकरणी मिका सिंगला दिलासा; तब्बल 17 वर्षानंतर कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय




सुकन्या मोने आणि संजय मोने यांच्या लेकीचे नावं आहे ज्युलिया मोने. ज्युलिया ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. ज्युलिया ही सध्या परदेशात शिक्षणासाठी गेली आहे. सोशल मीडियावरही तिची चांगलीच चर्चा असते. सुकन्या मोने आणि संजय मोने हे लोकप्रिय मराठी कलाकार आहेत. त्यांच्या अनेक चित्रपट आणि मालिकांतील भुमिका या गाजल्या आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


त्यांनी एकत्र 'कुसूम मनोहर लेले' या नाटकातूनही काम केले आहे. हे नाटकही तेव्हा प्रचंड गाजले होते. गेल्या दोन वर्षांपासून 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाची चर्चा आहे. आता अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.