मुंबई : अडल्ट स्टार अशी ओळख असणाऱ्या सनी लिओनी हिनं काही वर्षांपूर्वी तिचा मोर्चा बॉलिवूडकडे वळवला. पाहता पाहता सनीनं बॉलिवूडमध्येही तिची वेगळी ओळख निर्माण केली. हे तेच दिवस ठरले जेव्हा तिनं पॉर्न इंडस्ट्रीपासून दुरावा पत्करला. (Adult star)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनीच्या मादक सौंदर्यानं कायमच चाहत्यांना घायाळ केलं. तिच्या चेहऱ्यावर असणारी निरागसता वेळोवेळी सर्वांच्या मनाचा ठाव घेत गेली. पण, आता म्हणे सनीच्या सौंदर्याला टक्कर देणारं एक नाव समोर आलं आहे. 


हिंदी चित्रपटसृष्टीसाठी या सौंदर्यवतीचं नाव नवं नाही. कारण तिनं, राम गोपाल वर्माच्या 'क्लायमेक्स' या चित्रपटातही काम केलं आहे. मिया मालकोवा असं या अडल्ट स्टारचं नाव. 


2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'क्लायमेक्स' या चित्रपटातून मिया झळकली होती. या चित्रपटात तिच्या दिलखेच अदा पाहायला मिळाल्या होत्या. सौंदर्याची आणि मादकतेची खाण म्हणजे काय, असा प्रश्न पडला तेव्हा तेव्हा मियाचंच नाव पुढे आलं. 


अमेरिकेत मिया एक पॉर्न स्टार म्हणून ओळखली जाते. ती सनीलाही टक्कर देत आहे. पहिल्या चित्रपटानंतर तिच्या नावाची चर्चा बॉलिूडमध्येही पाहायला मिळाली होती. या चित्रपटापूर्वीही वर्मानं तिच्यासोबत काम केलं होतं. 




1992 मध्ये मियाचा जन्म कॅलिफोर्नियात झाला होता. फ्रेंच कॅनडियन आणि जर्मन आयरिश अशीही तिची ओळख आहे. सोशल मीडियावर मिया बरीच सक्रिय आहे. ती सतत काही बोल्ड फोटो शेअर करत असते. 


वयाच्या 16 व्या वर्षी तिनं McDonald's मध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. यानंतर तिनं दुसऱ्या कंपनीत कामाची सुरुवात केली आणि आठवड्याच्या अखेरीस ती अडल्ट फिल्मसाठी काम करु लागली. तिला या कामासाठी पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं आहे.