Surbhi Chandna Wedding Dress :  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक सुरभि चंदना आहे. करिअरच्या सुरुवातील सुरभिनं 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेती स्वीटीची भूमिका साकारली होती. मात्र, सुरभिला खरी ओळख ही ‘इश्कबाज’ आणि ‘नागिन’ या मालिकेतून मिळाली आहे. सुरभिचे लाखो चाहते आहेत. सुरभि ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. लवकर सुरभि लग्न बंधनात अडकणार आहेत. त्यासाठी तर त्यांनी नुकतंच प्री-वेडिंग शूट केलं असून त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. मात्र, सुरभिनं तिच्या लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमांसाठी आणि लग्न मग त्यानंतरच्या कार्यक्रमांसाठी कपडे हवे आहेत. तर हे कपडे सुरभिनं फ्री मध्ये म्हणजेच फुकटात मागितल्याचे डिझायनर आयुषनं सांगितले आहे. त्यानं दावा केला आहे की सुरभिनं त्याच्याकडे फुकटात कपडे मागितले. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
 
सुरभि तिच्या लग्नात एकाहून एक अशा डिझायनर्सचे कपडे परिधान करणार आहेत, मात्र या सगळ्याआधी सोशल मीडियावर एका डिझायनरनं सुरभि चांदणाविषयी असं काही सांगितलं आहे. आयुष केजरीवालनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत आयुषनं या व्हिडीओत सांगितलं की कशा प्रकारे सेलिब्रिटी त्यांच्या स्वत:च्या लग्नात फुकटात कपडे मागतात. त्यासोबत या सगळ्याचा त्याला कसा त्रास होतो हे देखील सांगितलं आहे. या व्हिडीओत आयुष म्हणाला आहे की सुरभि तिच्या स्वत: च्या लग्नासाठी फ्रीमध्ये कपडे मागत आहे. तर तिचा हा मेसेज तिची स्टायलिस्ट साची विजयवर्गीयनं केला आहे. फुकटात कपडे मागितल्यानं आयुषला खूप राग आला आणि त्यानं हा सगळा राग व्हिडीओमध्ये व्यक्त केला. त्याशिवाय त्यानं कपडे देण्यास नकारही दिला आहे.


 

 

 

 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आयुषनं पुढे सांगितलं की 'जयपुरच्या एका जुन्या हॉटेलमध्ये या सेलिब्रिटीचं लग्न आहे. हे तिच्याच स्टायलिस्टनं सांगितलं. आता हॉटेलमध्ये आहे तर ते फ्रीच असणार. तिला देण्यापेक्षा मी हे सगळे कपडे माझ्या ग्राहकांना फुकटात देईल. पुढे हे देखील सांगितलं की कधीच कोणत्या सेलिब्रिटीनं माझ्याकडून कपडे खरेदी केले नाही किंवा त्याचे पैसे दिले नाहीत.' त्यानंतर त्यानं सगळ्या इन्फ्लुएन्सर्स विषयी खुलासा केला की 'हे लोक कधीच पैसे देऊन कपडे खरेदी करत नाही. सगळंच फुकटात हवं. त्यांना काही फरक पडत नाही की जे त्यांनी परिधान केलं आहे ते कसं दिसतंय. त्यांना ब्रँड आवडतं किंवा कपडे आवडतात. आता माझं काम सुरु राहिली किंवा नाही, मी माझ्या ग्राहकांसोबत खोटं बोलू शकतं नाही.'


हेही वाचा : 'चोली टाइट बांध लें ताकि... '; करीना, तब्बू आणि क्रिती सेननच्या The Crew चा टीझर तूफान व्हायरल


तर हा व्हिडीओ शेअर करत आयुषनं कॅप्शन दिलं की 'नाही, तुम्ही फक्त सेलिब्रिटी आहात म्हणून मी तुम्हाला तुमच्याच लग्नासाठी फुकटात कपडे देणार नाही.'