कंबर, छातीवरुन मला.... ; लोकप्रिय अभिनेत्रीकडून कास्टिंग काऊचच्या भयंकर प्रसंगाचा उलगडा
काही मोठ्या नावांचा यात समावेश आहे.
मुंबई : झगमगणाऱ्या कलाजगतामध्ये कास्टिंग काऊच एक असा मुद्दा आहे ज्यामुळं या झगमगाटाला जणू कोणाची दृष्टच लागली आहे. मागील काही वर्षआंपासून कलाकार हे कास्टिंग काऊचच्या मुद्द्यावर मोकळेपणानं बोलू लागले आहेत. काही मोठ्या नावांचा यात समावेश आहे.
आता म्हणे आणखी एका अभिनेत्रीनं तिच्यासोबत घडलेल्या कास्टिंग काऊचच्या प्रसंगाबाबत खुलासा केला आहे.
एका मुलाखतीदरम्यान संवाद साधताना दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये हे सर्व खूप प्रमाणात चालतं असं वक्तव्य तिनं केलं आहे. ती अभिनेत्री म्हणजे सुरवीन चावला.
टेलिव्हिजन विश्वानंतर ज्यावेळी चित्रपटांमध्ये कारकिर्दीला नवं वळण देण्याचा प्रयत्न सुरवीन करत होती. तेव्हाच तिला कास्टिंग काऊचला सामोरं जावं लागलं होतं.
मुंबईत पहिल्याच चित्रपटाच्या वेळी मिटींगदरम्यान तिच्यासोबत हे सारं घडलं. जिथे तिला वजन, कंबर, छातीचं माप या साऱ्याशी संबंधित प्रश्न विचारले गेले.
समोर आलेल्या या प्रसंगानंतर तिला स्वत:वरच शंका येऊ लागली. कोणत्याची महिलेची परिभाषा या निकषांवर नसते असं तिचं ठाम मत.
काळानुरुप सध्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी बदलली आहे. आता कला जगतामध्ये बॉडी शेमिंग, मानसिक स्वास्थ्य यांसारख्या मुद्द्यांवर बोललं जात आहे. रिजेक्शनवर मोकळेपणानं व्यक्त होणं सहज मानलं जात आहे, असंही ती म्हणाली.