वयाच्या 51 व्या वर्षी वेब सीरीजमध्ये तब्बूने दिले बोल्ड सीन, चाहत्यांमध्ये उडाली होती खळबळ
तब्बूने या वेब सीरीजमध्ये बेड सीन देऊन चाहत्यांना धक्का दिला होता.
मुंबई : तब्बू ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. वयाच्या 51 व्या वर्षी ही ती सिंगल आहे. तिने अजून ही विवाह केलेला नाही. पण फिटनेसच्या बाबतीत ती खूपच आग्रही आहे. अलीकडेच तब्बूच्या एका चित्रपटाने तिच्या चाहत्यांना धक्का दिला होता. बोल्ड आणि रोमँटिक सीन्समुळे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत तब्बूचा हा चित्रपट पाहू शकत नाही.
तब्बूने नुकत्याच एका वेब सीरीजमध्ये काम केले, ज्यामध्ये ती तिच्यापेक्षा लहान असलेल्या ईशान खट्टरसोबत खूप बोल्ड सीन देताना दिसली होती. ही वेब सीरीज ही बोल्डनेसच्या बाबतीत चर्चेत राहिली.
तब्बू या वेब सीरीजमध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेची भूमिका साकारताना दिसली होती. ज्यामध्ये ती अभिनेता इशान खट्टरसोबत बोल्ड सीन्स करताना दिसत आहे.
'ए सुटेबल बॉय' वेब सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज झाली होती. यामध्ये तब्बू एका वेश्येची भूमिका साकारताना दिसली होती. या वेब सीरिजमध्ये बेड सीन आणि किसिंग सीन देताना तब्बू अजिबात घाबरली नाही.