मुंबई : अभिनेत्र तब्बू कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आली. अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत तिचं नाव जोडण्यात आलं. पण आजही तब्बू एकटं आयुष्य जगते. एक काळ असा होता जेव्हा तब्बूचं नाव प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता अक्किनेनी नागार्जुनसोबत  (Akkineni Nagarjuna) जोडण्यात आलं. दोघांच्या भेटीच्या आणि प्रेमाच्या चर्चा सर्वत्र तुफान रंगल्या होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याविषयी तब्बूने अनेक वर्षांपूर्वी दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'मध्ये मोठा खुलासा केला. 2007 साली जेव्हा करणने तब्बूला  नागार्जुनसोबत असलेल्या नात्याबद्दल विचारलं तेव्हा तिने उघडपणे सर्व गोष्टी सांगितल्या. 



तब्बू म्हणाली होती, 'बॉयफ्रेंड येत जात राहतात, पण  नागार्जुन कायम टिकून राहिल. मला नाही माहिती याठिकाणी काय सांगायलं हवं.. पण तो माझ्या आयुष्यातील खास व्यक्तींपैकी एक आहे.'


ती पुढे म्हणाली, 'जगातील कोणतचं नातं आम्हाला दूर करू शकत नाही... माझ्याकडे आमच्या नात्यासाठी कोणताही लेबल नाही... यासाठी मी काही करू शकत नाही...'



एवढंच नाही तर  नागार्जुनने देखील तब्बूसोबत असलेल्या नात्याबद्दल सांगितलं. 'तब्बू 16 आणि मी 22 वर्षांचा होतो तेव्हा आमची ओळख झाली. आम्ही चांगले मित्र आहोत. माझ्याकडे लपवण्यासारखं काही नाही...' असं  नागार्जुन म्हणाला होता....