मुंबई : टीव्ही अभिनेत्री तान्या शर्मा आजकाल टीव्ही शो 'ससुराल सिमर का2'मध्ये दिसत आहे. ज्यामध्ये तिने आपल्या अभिनयाने सगळ्यांची मन जिंकली आहेत. या शोमध्ये तान्या शर्मा रीमा नारायणची भूमिका साकारत आहे. तान्या शोच्या सेटवरुन कायम आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. एका रंजक वळणापूर्वी आपल्या चाहत्यांसाठी तान्या शर्माने तिच्या इंस्टाग्रामवर काही बीटीएस फोटो शेअर केले आहेत. फोटोत असं दिसत आहे की, तान्या बाथटबमध्ये बेशुद्ध पडली आहे. फोटो शेअर करताना तान्याने लिहिलं आहे की, 'कदाचित शेवट?' फोटो शेअर करताच हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोत तान्या पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये पडलेली दिसत आहे. फोटोमध्ये तिचं मनगट कापलेलं दिसत असून ती बेशुद्ध पडली आहे. बाथटबमध्ये पडलेली तान्याच्या हातातून रक्त वाहताना दिसत आहे. तान्या शर्माला कॅज्युअल ड्रेसमध्ये क्लिक केलं गेलं आहे. तिने ब्लू टॉप आणि जीन्स परिधान केली आहे. या फोटोवर चाहत्यांप्रमाणेच अनेक कलाकारांनी देखील कमेंन्टचा वर्षाव केला 



तान्याच्या चाहत्यांनीही पोस्टवर कमेंन्ट करत आश्चर्य व्यक्त केलं. दरम्यान, 'ससुराल सिमर का 2' हा २०११च्या शो 'ससुराल सिमर का'चा सिक्वेल आहे ज्यात दीपिका काकर, अविका गोर आणि शोएब इब्राहिम यांनी भूमिका साकारल्या होत्या.