Tripti Dimri : अभिनेत्री तृप्ती डिमरीने 2017 मध्ये सनी देओल आणि बॉबी देओल यांच्यासोबत पोस्टर बॉईज चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याचबरोबर अभिनेत्रीने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यामधून तिला वेगळी ओळख देखील मिळाली आहे. अभिनेत्री 'अॅनिमल' चित्रपटात देखील दिसली आहे. तिच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली होती. तिला या चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच रणवीर इलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने एक मोठा खुलासा केला आहे. ज्यामध्ये ती म्हणाली की, रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटातील तिच्या भूमिकेमुळे ती प्रचंड रडली होती. तिने तिच्या इंडस्ट्रीतील सुरुवातीचा प्रवास, संघर्ष याबद्दल सांगितले. 'अ‍ॅनिमल' चित्रपटातील भूमिकेनंतर अभिनेत्रीला अनेक टीकेला सामोरे जावे लागले. ज्याचा परिणाम तिच्या मानसिक आरोग्यावर झाला होता. चित्रपटानंतर ती या टीकेसाठी मानसिकदृष्टया तयार नव्हती. 


बहिणीने दिला होता हा खास सल्ला


'अ‍ॅनिमल' प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्री चित्रपटातील तिच्या भूमिकेमुळे 3 दिवस रडत होती. लोक काय लिहितात याचं तिला भीती होती. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी तिला बहिणीने मदत केल्याचं तिने सांगितले. बहीण म्हणाली की, तू इथपर्यंत पोहोचण्यासाठी केलेली मेहनत फक्त तुलाच माहिती आहे. इतर कोणालाही माहिती नाही. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

स्वता: च्या भूमिकेवर अभिनेत्री नाराज


अभिनेत्रीने सोशल मीडियावरील नकारात्मक कमेंट्सकडे लक्ष देणे बंद केले आणि तिच्या कामावर लक्ष देण्यास सुरुवात केली. यातून बाहेर पडण्यासाठी रडणे आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी खूप महत्त्वाचे असल्याचे ती म्हणाली. म्हणूनच ती चित्रपट रिलीज झाल्यानंतर 3 दिवस रडत होती. अभिनेत्री म्हणाली की, 'अ‍ॅनिमल' पूर्वी तिला अशा टीकेला सामोरे जावे लागले नव्हते. कदाचित मुख्य प्रवाहातील चित्रटांमध्ये काम करण्याचा हा तोटा असावा. असं ती म्हणाली.