मुंबईः सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत राहते. उर्फीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल व्हायला काही मिनिटेच लागतात. आता पुन्हा एकदा उर्फीचा लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.



या व्हिडिओमध्ये उर्फी तिचा लेटेस्ट लुक फ्लॉंट करताना दिसत आहे. अलीकडेच उर्फी जावेद आणि राखी सावंत एकत्र एका पार्टीत सहभागी झाले होते. या पार्टीत आपल्या बोल्डनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या उर्फी आणि राखीने एवढी धमाल केली होती की, आता या दोघींचे व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.


पार्टीदरम्यान राखी आणि उर्फीने एकमेकांसोबत जोरदार डान्स केला. यादरम्यान राखी आणि उर्फी 'चोली के पीछे क्या है' गाण्यावर जबरदस्त बेली मूव्ह करताना दिसल्या. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की उर्फी पार्टीमध्ये इतकी धुंद झाली होती की ती हिल्स काढून स्टेजवर डान्स केला.



दुसर्‍या व्हिडिओमध्ये राखी आणि उर्फी डान्स फ्लोअरवर एकमेकांसोबत गप्पा मारताना दिसत आहेत. समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये राखी तिच्या फोनच्या सेल्फी कॅमेऱ्याने व्हिडिओ शूट करत आहे, तर उर्फी छान स्टेप्स करताना दिसत आहे.



उर्फीच्या इन्स्टाग्रामवर अलीकडेच 3 मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत. गोव्यात तिने मित्रांसोबत याचं सेलिब्रेशन केलं. त्याचवेळी राखी 3 मिलियन फॉलोअर्ससाठी उर्फीचे अभिनंदन करताना दिसली.


यासह उर्फीने असेही घोषित केले की 300 मिनियन फॉलोअर्सनंतर ती दुबईमध्ये सर्वांसाठी एक भव्य पार्टी आयोजित करेल.


यादरम्यान राखी सावंत उर्फी जावेदसोबत खूप मस्ती करताना दिसली. या दोघांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, जो व्हायरल भयानीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.


व्हिडीओमध्ये राखी उर्फीला डान्स करायला सांगताना दिसत आहे पण उर्फीने हाय हिल्स घातल्यामुळे ती हे स्टेप करू शकत नाही. यादरम्यान उर्फी ही स्टेप करताना वारंवार तिचा ड्रेस सांभाळताना दिसत आहे.