उर्मिला कोठारे आणि जिजाचे फोटो सोशल मीडियावर पसंतीला
जिजाचे सेल्फी व्हायरल
मुंबई : आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांच्या घरात जानेवारीत चिमुकलीचं आगमन झालं. जिजा हे गोंडस नाव या बाळाचं ठेवण्यात आलं. सध्या जिजा आणि उर्मिला कोठारे यांचे खूप फोटो सोशल मीडियावर येत आहे. आदिनाथ कोठारे याचे नांदेडमध्ये सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी जिजा आणि उर्मिलाने खास हजेरी लावली.
जिजाच्या बारश्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. आदिनाथने सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून तिचे नाव सगळ्यांना सांगितले होते. एवढेच नव्हे तर या गोंडस जिजाचे फोटो देखील आदिनाथने सोशल मीडियावर शेअर केले होते. उर्मिला आणि आदिनाथ त्यांच्या सोशल नेटवर्किंग साइटवर त्यांच्या या लाडक्या चिमुकलीचे फोटो पोस्ट करत असतात आसनी त्यांचे चाहते देखील या फोटोंना भरभरून लाईक्स देतात. का
उर्मिलाने नुकताच जिजा सोबत एक फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला आहे. या फोटोत त्या दोघीही खूपच छान दिसत आहेत. या फोटोसोबत उर्मिलाने एक छानसे कॅपशन देखील दिले आहे. तिने लिहिले आहे की, आम्हाला आतापासूनच सेल्फी काढायला आवडायला लागले आहे. माझ्या बेबीची सगळ्यात पहिली ट्रिप... आम्ही कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनाला आलो आहोत. आमच्या चिमुकलीवर देवीचा आशीर्वाद नेहमीच राहू दे...
उर्मिला आणि जिजाच्या या फोटोला आतापर्यंत 66 हजारहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. तसेच अनेकांनी त्यांना हा फोटो खूप आवडला असल्याचे प्रतिक्रियांच्या माध्यमातून सांगितले आहे.