गोल्डन बिकिनीमध्ये अभिनेत्रीने फोटो केले शेअर, स्विमिंग पूलमध्ये दाखवला हॉट अंदाज
वयाच्या 43 व्या वर्षी अभिनेत्रींनी बिकिनी घालून पूल फोटो शेअर केले आहेत.
मुंबई : टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकिया कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या ती नागिन 6 मध्ये काम करत आहे. उर्वशीच्या अभिनयाने सगळेच प्रभावित झाले आहेत, पण आता तिने तिच्या पूल फोटोंमुळे हृदयाची धडधड आणखी वाढवली आहे. उर्वशीच्या बिकिनी फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला आहे.
वयाच्या 43 व्या वर्षी बिकिनी घालून उर्वशी ढोलकियाने चाहत्यांना घायाळ केले आहे. टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकियाची बिकिनी फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती सोनेरी रंगाच्या स्विमवेअरमध्ये दिसत आहे.
उर्वशीने तिच्या बोल्ड स्टाईलने सगळ्यांनाच धक्का दिला आहे. उर्वशीच्या सौंदर्याचे चाहते ही कौतूक करत आहेत. कदाचित हेच कारण आहे की प्रत्येकजण तिच्या फोटोंना खूप पसंत करत आहे. अनेक यूजर्स अभिनेत्रीच्या फोटोंवर फायर इमोजी पोस्ट करत आहेत.