Twinkle Khanna : बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना यांची लेक आणि अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाचा आज 51 वा वाढदिवस आहे. ट्विंकल खन्नानं तिच्या वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. फक्त इतकंच नाही तर जवळपास 5 वर्ष तिनं या क्षेत्रात काम केलं. त्यानंतर तिनं अभिनय क्षेत्राला रामराम केलं. अभिनय सोडत ट्विंकल खन्नानं पुस्तकं लिहिण्यास सुरुवात केली. तिच्यात इतकी शिक्षणाची आवड होती की वयाच्या 50 व्या वर्षी तिनं लंडन यूनिव्हर्सिटीमधून 'गोल्डस्मिथ्स' मध्ये फिक्शन राइटिंगमध्ये मास्टर्सची डिग्री घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विंकल खन्नाच्या कामाविषयी बोलायचं झालं तर 1996 मध्ये तिनं 'बरसात' या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात ट्विंकलसोबत बॉबी देओल हा महत्त्वाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरपहिट ठरला होता. चित्रपट हिट होताच ट्विंकल खन्नाला आणखी चित्रपटांच्या ऑफर मिळू लागल्या. ट्विंकल खन्नानं अजय देवगनसोबत 'जान' या चित्रपटात काम केलं. 



तिन्ही खानसोबत केलं काम


ट्विंकल खन्नानं 1998 मध्ये 'जब प्यार किसी से होता है' या चित्रपटात सलमान खानसोबत काम केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बादशाह' या चित्रपटात ट्विंकलनं शाहरुख खानसोबत काम केलं. हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. तर आमिर खानसोबत ट्विंकलनं 'मेला' या चित्रपटात काम केलं. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. 


त्यानंतर 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दिल तेरा दीवाना' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ट्विंकल आणि अक्षय कुमार जवळ आहे. त्यांच्यातल्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. ट्विंकलनं तिच्या करिअरमध्ये 17 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं. पण 2000 मध्ये प्रदर्शित झालेला 'मेला' हा चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर ट्विंकलनं अभिनय क्षेत्राला रामराम केला. 


ट्विंकलनं तिच्या अभिनयातील करिअरमध्ये अनेक चित्रपट केले पण आज ती एक अभिनेत्री म्हणून नाही तर लेखिका म्हणून ओळखली जाते. 'मेला' हा चित्रपट फ्लॉप ठरताच ट्विंकल खन्नानं 2001 मध्ये अक्षय कुमारशी लग्न केलं. ट्विंकल खन्नानं आजवर 4 पुस्तकं लिहिल आहेत. तर 2015 मध्ये 'मिसेस फनी बोन्स' नावाचं तिचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. त्यानंतर 2016 मध्ये  'द लेजेंड लक्ष्मी प्रसाद' आणि 2018 मध्ये 'पजामा वर फॉर्गिविंग' ही पुस्तकं प्रकाशित झाली. याशिवाय 2023 मध्ये 'वेलकम टू पॅराडाइज' नावाचं तिचं पुस्तक प्रकाशित झालं.