मुंबई : अभिनेत्री आणि सतत वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या राखी सावंत ही (Rakhi Sawant) गेल्या काही दिवसांपासून कोणा एका कारणामुळं बरीच निराश दिसत आहे. याचं कारण ठरत आहे, राजकीय वर्तुळात राखी सावंतच्या नावाचा चुकीच्या पद्धतीनं करण्यात आलेला उल्लेख. मीम्स, विनोद इथपर्यंत सारंकाही ठीक, पण ज्यावेळी कोणा एकाला हिणवण्यासाठी आपल्या नावाचा उल्लेख केला जात आहे, असं राखीच्या लक्षात आलं, तेव्हा मात्र तिचा संताप अनावर झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम आदमी पार्टीचे नेते आणि प्रवक्ते राघव चड्ढा यांनी पंजाबमधील काँग्रेसचं राजकारण पाहता नवज्योत सिंग सिद्धू यांना पंजाबच्या राजकारणातील राखी सावंत म्हटलं. हे प्रकरण शांत होत नाही, तोच उत्तर प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष हृदय नारायण दीक्षित यांनीही राखीच्या नावाचा उल्लेख आक्षेपार्ह पद्धतीनं केला. ज्यामुळं आता राखीच्या संतापानं परिसीमा गाठली आहे. 


हा सारा प्रकार पाहिल्य़ानंतर राखीनं ओशिवरा पोलीस स्थानकात हृदय नारायण दीक्षित यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. आपण आम आदमी पार्टीविरोधातही तक्रार करत कारवाई करणार असल्याचा इशारा राखीनं दिला आहे. 


राखीनं दिलेला हा इशारा पाहता सध्या तिनं फक्त नेतेमंडळींना तंबी दिली आहे. पण, येत्या काळात जर असंही कुणी चुकीच्या पद्धतीनं तिच्या नावाचा उल्लेख केला आणि राखीच्या कचाट्यात सापडला तर मात्र तुमच्याही अडचणी वाढू शकतात ही बाब नाकारता येत नाही.