मुंबई : बॉलीवूडमध्ये अशा अनेक हिरोइन्स आहेत ज्यांचं वय ४० पेक्षा जास्त आहे. पण या अभिनेत्रींनी स्वतःला अशा प्रकारे फिट ठेवलं आहे की, त्यांचं वय त्यांच्या चेहऱ्यावरून अजिबात कळून येत नाही. एवढंच नव्हेतर या अभिनेत्रीही लहान कपडे घालण्यापासून स्वत:ला रोकू शकत नाहीत. पाहा  40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या या 5 अभिनेत्रींचे ग्लॅमरस लूक.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या यादीत नीना गुप्ता यांचं नाव सगळ्यात प्रथम येतं. 62 वर्षीय नीना गुप्ता केवळ चित्रपटांमध्येच सक्रिय नसून अनेकवेळा लहान कपडे परिधान करताना दिसतात.


https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/NNN_2.png


48 वर्षीय मलायका अरोराच्या सौंदर्याची नेहमीच चर्चा होत असते. ही अभिनेत्री केवळ स्टायलिशच नाही तर एकापेक्षा एक शॉर्ट ड्रेस परिधान करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवते.


https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/MMM_1.png


51 वर्षीय पूजा बेदीनेही स्वत:ला वयाच्या मर्यादेत बांधलं नाही. अभिनेत्री दररोज सोशल मीडियावर शॉर्ट ड्रेसमधील फोटो शेअर करत असते.



46 वर्षीय शिल्पा शेट्टीबद्दल काय बोलायचं. अनेकदा अभिनेत्री एकापेक्षा-एक रिवीलिंग आणि शॉर्ट ड्रेस परिधान करताना दिसते.



अनेक वर्षांपूर्वी मिस युनिव्हर्सचा किताब पटकावलेल्या सुष्मिता सेननेही स्वत:ला खूप मेंटेन ठेवलं आहे. ती देखील शॉर्ट ड्रेसेस घालण्यापासूनही स्वत:ला थांबवू शकत नाही.