नात्यातील दुराव्याबद्दल आदिनाथमागोमाग उर्मिलाचं लक्षवेधी वक्तव्य
मराठीतील प्रसिद्ध कपल आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानिटकर कोठारे ही जोडी नेहमी चर्चेत असते.
मुंबई : मराठीतील प्रसिद्ध कपल आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानिटकर कोठारे ही जोडी नेहमी चर्चेत असते. मात्र यावेळी ही जोडी सध्या एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. या जोडीनं २०११ मध्ये सप्तपदी घेतली.
लग्नानंतर उर्मिलाने इंडस्ट्रीपासून ब्रेक घेतला. घरचं प्रॉडक्शन हाऊन असूनही ती अभिनयापासून लांब राहिली. मात्र अचानक उर्मिलाने छोट्या पडद्यावर पुनरागमन करुन चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेतून महत्वाच्या भूमिकेत ती दिसू लागली. आता चर्चा होतेय की घरचं प्रॉडक्शन हाऊस असताना इतक्या वर्षांनी उर्मिला दुसऱ्या प्रॉडक्शन हाऊसच्या मालिकेतून पुर्नपदार्पण का करतेय? याचं अद्याप कोणतं स्पष्टिकरण प्रश्न उर्मिलाकडून आलेलं नाही. यानंतर चर्चा सुरु झाली ती म्हणजे उर्मिला-आदिनाथमध्ये काही तरी बिनसल्याची. आणि हे ऐकून त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
पण आता आणखी एक दुसरं महत्त्वाचं कारण समोर आलंय ज्यानं यांच्यात बिनसल्याच्या बातमीच्या चर्चांना उधाण आलं आहे. उर्मिलाचा ४ मे रोजी वाढदिवस झाला. आदिनाथ नेहमीच याआधी बायकोच्या वाढदिवशी तिला शुभेच्छा देतो किंवा दोघं एकत्र सेलिब्रेशन करताना अनेक फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करताना दिसायचे. पण यावर्षी मात्र तसं काहीच आदिनाथनं केलं नाही. त्यानं बायकोच्या वाढदिवशी एकही शुभेच्छा देणारी साधी पोस्टही शेअर केली नाही. आणि इथच त्यांच्या दुराव्याच्या बातमीने जोर धरला.
याच बरोबर उर्मिलाही कुठेच चंद्रमुखी सिनेमाच्या प्रमोशनला दिसली नाही किंवा तिने आदिनाथला सिनेमासाठी कुठेच शुभेच्छा दिल्या नाहीत. याचबरोबर उर्मिलाने आदिनाथला इन्स्टाग्रामवर अनफॉलोही केलं आहे. मात्र अजूनही आदिनाथ उर्मिलाला सोशल मीडियावर फॉलो करतोय. या सगळ्यानंतर उर्मिला आणि आदिनाथमध्ये दुरावा आल्याचं बोललं जात आहे.
मात्र आता यावर आदिनाथने झी २४ तासशी साधलेल्या संवादात आदिनाथ म्हणाला की, या सगळ्या केवळ अफवा आहेत. यावर मी आणि उर्मिला बिलकूल लक्ष देत नाही. आमच्या आयुष्यात आम्ही एकदम खूश आहोत. सध्या आम्ही आमच्या कामात व्यस्त आहोत. त्यामुळे लोकं काहीही बोलत आहेत. पण आमच्यात अजिबात काहीच बिनसलेलं नाही.
आज १३ मे रोजी आदिनाथ आपला वाढदिवस साजरा करत आहे. आणि या खास प्रसंगी उर्मिला कोठारेने त्याच्या वाढदिवशी सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. याच बरोबर आदिनाथने देखील तिची ही पोस्ट रिपोस्ट केली आहे. एवढंच नव्हेतर दोघांनीही या पोस्टद्वारे एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. या सगळ्यानंतर आदिनाथ-उर्मिलामध्ये सगळं काही सुरळीत आहे. एवढं मात्र नक्की.