Adipurush Action Trailer: गेल्या अनेक दिवसांपासून  ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. हा चित्रपट 16 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शनाआधी निर्मात्यांनी या चित्रपटाचा अॅक्शन ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या धमाकेदार ट्रेलरमध्ये सीता हरण ते पवन पुत्र हनुमान रावणाच्या लंकेत आग लावेपर्यंत सगळं पाहायला मिळतं आहे. थोड्या वेळातच लाखोंच्या संख्येनं प्रेक्षकांनी हा ट्रेलर पाहिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटाचा ट्रेलर हा 2 मिनिट 24 सेकंदाचा आहे. या आधी जो ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्यात श्रीराम यांच्या भावना पाहायला मिळाल्या होत्या. तर ट्रेलरच्या सुरुवातीला रावणाच्या भूमिकेत असलेला सैफ अली खान भिक्षा मागत माता जानकी म्हणजे कृती सेननचा छळ करत तिला लक्ष्मण रेखा पार करण्यास भाग पाडतो. त्यानंतर रावण सीता यांचं अपहरण करतो. रावणाचा हा गर्व मोडून काढण्यासाठी श्रीराम त्याच्याशी युद्ध करतात. या दुसऱ्या ट्रेलरमध्ये श्रीराम अॅक्शनमध्ये दिसत आहेत. 


आदिपुरुषचा ट्रेलर पाहिल्यानंतर नक्कीच सगळे राम भक्तीत लीन होतील. पडद्यावर राम आणि सीता यांना पाहून लोक नक्कीच भावूक होतील. या चित्रपटात प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यानं केलेल्या अभिनयानं सगळ्यांना समोर श्रीराम आहेत असे वाटत असल्याचे अनेकांनी कमेंटमध्ये म्हटले आहे. तर रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान हा जबरदस्त अभिनय करताना दिसत आहे. या चित्रपटाचे VFX हे कामल आहेत. 


हेही वाचा : Ashish Vidyarthi म्हणाले... दुसऱ्या लग्नावर आणि घटस्फोटावर मुलाची अशी होती प्रतिक्रिया


दरम्यान, हा ट्रेलर पाहण्यासाठी तिरुपतीमध्ये ट्रेलर पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. ही गर्दी पाहून आपण बोलू शकतो की आदिपुरुष हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नक्कीच चांगली कमाई करणार आहे. हा ट्रेलर पाहण्यासाठी आलेले सगळे प्रेक्षक तिथे श्री राम नावाचा जप करत होते, असं करत ते त्यांची भक्ती दाखवत आहेत. तर काही प्रभासचे चाहते हे मैदानात प्रभासचे नाव घेताना दिसले. 



चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय


काही दिवसात आदिपुरुष हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळणार आहे. या आधी निर्मात्यांनी असा निर्णय घेतला आहे की प्रत्येक थिएटरमध्ये चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यान, एक सीट ही रिकामी राहिल. ही सीट हनुमान यांच्यासाठी खास राखिव असेल. त्याचं कारण म्हणजे असं म्हणतात की जेव्हापण रामायणचा पाठ करण्यात येतो, तेव्हा तिथे पवन पुत्र हनुमान उपस्थित राहतात.