मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीनं (Aditi Rao Hydari) चित्रपटांमध्ये छोट्या पण महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अदिती ही राजघराण्यातील आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल. अभिनयासोबतच अदिती गायन आणि नृत्यातही प्रवीण आहे. त्यासाठी तिनं प्रशिक्षण घेतलं. बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यापूर्वी अदितीनं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम केले होते. अदितीचा जन्म 28 ऑक्टोबर 1986 रोजी हैदराबाद, आंध्र प्रदेश येथे झाला, जे आता तेलंगणामध्ये आहे.  . तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अदितीनं 2006 मल्याळम चित्रपट प्रजापतीद्वारे पदार्पण केले. बॉलिवूडमध्ये ती बहुतेक सहाय्यक भूमिकांमध्ये दिसली आहे. 'रॉकस्टार', 'मर्डर 3', 'वजीर' आणि 'पद्मावत' या लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांमध्ये ती दिसली.  'दिल्ली 6' हा तिचा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट होता. अदितीने 'मणिरत्नम'च्या कात्रु वेलीदाई आणि सुफियुम सुजातायुमसह अनेक दक्षिणेतील चित्रपटांमध्ये काम केले. (aditi rao hydari birthday special unknow facts about her love life and films) 



अदितीही हैद्राबादयेथील राजघराण्यातील असल्याची माहिती खूप कमी लोकांना आहे. अदितीच्या वडिलांचं नाव एहसान हैदरी आणि आईचे नाव विद्या राव आहे. आदिती या दोन राजघराण्यातील मोहम्मद सालेह अकबर हैदरी आणि वानापर्थी घराण्याचे माजी राजा केजे रामेश्वर राव आहेत. ती मोहम्मद सालेह अकबर हैदरी यांची नात आहे. अदिती ही अकबर हैदरी यांची नात आहे. आमिर खानची माजी पत्नी किरण राव ही तिच्या मामाची मुलगी आहे.  


36 वर्षीय अदितीचं नाव अनेक लोकांशी जोडले गेले. तिला तिच्या लव्ह लाईफबद्दल बोलणे आवडत नाही. वयाच्या 17 व्या वर्षी आदिती अभिनेता सत्यदीप मिश्राच्या प्रेमात पडली. सत्यदीपनं चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. 2012 मध्ये हे जोडपं विभक्त झालं. अदितीनं तिचं लग्न आणि घटस्फोट बराच काळ गुप्त ठेवला होता. रिपोर्टनुसार, 2009 मध्ये त्यांचे लग्न झाले. 2013 मध्ये अदितीने एका मुलाखतीत कबूल केले की लग्नाच्या दोन वर्षानंतर ते विभक्त झाले. अदिती आणि 'रंग दे बसंती' फेम अभिनेता सिद्धार्थ एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत. दोघं अनेक प्रसंगी एकत्र दिसत आहेत.