ना सुपरस्टार ना अभिनेता, तरी कुबेरापेक्षा अफाट संपत्ती; राणी मुखर्जीशी नातं असलेला `तो` आहे तरी कोण?
Aditya Chopra Net Worth: ना तो सुपरस्टार ना अभिनेता पण त्याने अनेक हिरो हिरोईनला सुपरस्टार बनवलं. त्याच्या चित्रपटात काम करणारे अनेक कलाकार आज बॉलिवूड गाजवतायेत.
Aditya Chopra Net Worth : बॉलिवूडमध्ये अभिनेत्री आणि अभिनेत्यांशिवाय असेही व्यक्ती असतात ज्यांच्या नावाने प्रेक्षक पिक्चर पाहिला येतात. हे असतात त्या पिक्चरचे दिग्दर्शक, या यशस्वी दिग्दर्शक आणि निर्मात्यासोबत काम करण्यासाठी अनेक सुपरस्टार्स स्वप्न पाहत असतात. आज आम्ही अशा दिग्दर्शक आणि निर्मात्याबद्दल बोलतोय तो अफाट संपत्तीचा मालक असून त्याच नातं राणी मुखर्जीशी आहे. हा आहे बॉलिवूड प्रसिद्ध चित्रपट निर्माता आदित्य चोप्रा.
वडील यश चोप्राच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी इंडस्ट्रीत आपलं साम्राज्य निर्माण केलं. आज त्याची स्वत:ची ओळख असून त्याला कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याचा नावातच सगळं काही येतं. तो क्वचितच सार्वजनिक ठिकाणी दिसतो पण त्याच्या कामामुळे तो कायम चर्चेत असतो.
वडिलांच्या कंपनीला नव्या उंचीवर नेलं!
यश चोप्रा यांच्या निधनानंतर आदित्यने वडिलांच्या कंपनीला नव्या उंचीवर पोहोचवलं. आज देशातील सर्वात मोठे बॅनर आहे. त्याने बॉलिवूडमधील अनेक सुपरस्टार्ससोबत काम केलंय. भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात जास्त कमाई करणारे चित्रपट हे आदित्य चोप्राच्या कंपनीने बनवले आहेत. त्याची संपत्ती एवढी आहे की, बच्चन आणि कपूर यांना त्याने मागे टाकलंय.
कमी वयात कामाला सुरुवात!
आदित्यचा जन्म हा 21 मे 1971 झाला. त्याने बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पदवी मिळवली. त्याने वडिलांसोबत वयाच्या 18 व्या वर्षीपासून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली. त्याने वडिलांसोबत चांदनी (1989), लम्हे (1991), डर (1993) यांसारख्या चित्रपटांत सहकार्य केलंं.
आदित्य चोप्राने आपल्या वडिलांचा वारसा पुढे नेत वयाच्या 23 व्या वर्षी शाहरुख खान आणि काजोलसोबत 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या ऑल-टाइम ब्लॉकबस्टर रोमँटिक कॉमेडी-ड्रामा असलेला चित्रपट एकट्याने केला. या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड मोडत तो ब्लॉकबस्टर पिक्चर ठरला.
आदित्य चोप्रा नेट वर्थ
आदित्य चोप्राच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर कुबेरापेक्षाही अफाट संपत्ती आहे. DNA नुसार, आदित्य चोप्रा 7200 कोटी रुपयांच्या संपत्तीसह कुटुंबातील सर्वात श्रीमंत सदस्य आहे. तो देशातील सर्वात मोठ्या फिल्म स्टुडिओ यशराज फिल्म्सचे अध्यक्ष असून त्यासाठी तो 36 कोटी रुपये मासिक पगार घेतो. तर त्याच्याकडे जुहूमध्ये तीन बंगले आणि 8 कोटी रुपयांच्या नवी मुंबईतील घरासह कोट्यवधींची मालमत्ता आहे. बंगल्याशिवाय त्याच्याकडे आलिशान कराचं कलेक्शन आहे. BMW आणि रेंज रोव्हर सारख्या कार त्याच्याकडे आहेत. आदित्य चोप्रा राणी मुखर्जीला डेट करत असताना तो विवाहित होता. त्याने राणी मुखर्जीशी लग्न करण्यासाठी पहिली बायको पायल हिला घटस्फोट दिला.