आदित्य नारायणच्या लेकीची पहिली झलक, फोटो शेअर करत म्हणाला....
`पापा की परी....` पाहा आदित्य नारायणच्या लेकीची पहिली झलक, फोटो व्हायरल होताचं सोशल मीडियावर चर्चा
मुंबई : गायक उदित नारायण आजोबा तर अभिनेता आदित्य नारायण बाबा झाला आहे. आदित्यची पत्नी श्वेता अग्रवालने (Shweta Agarwal) एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. श्वेताने 24 फेब्रुवारी रोजी मुंबईत मुलीला जन्म दिला. आतापर्यंत आदित्यने मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला नव्हता, पण आता त्याने मुलीचा पहिली झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. सध्या सर्वत्र आदित्य आणि मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फोटोमध्ये आदित्यने मुलीला कडेवर घेतलं आहे. लेकीसोबत फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये, 'ग्रेटफूल, भाग्यवान असं लिहिलं आहे. आता काही दिवस छोट्या एंजलसोबत... तुम्हाला लवकरचं भेटेल डिजीटल मेडीया...' असं लिहिलं आहे.
काही दिवसांपूर्वी आदित्यने लेकीचं नाव देखील सांगितलं. आदित्यने इंस्टाग्रामवर (Aditya Narayan) वर Ask Me Session मध्ये आपल्या मुलीच्या नावाचा खुलासा केला आहे.
आदित्यला चाहत्यांनी त्याच्या मुलीचं नाव विचारलं. तेव्हा त्यांनी मुलीचं नाव 'त्विशा नारायण झा' असल्याचं म्हटलं.
तिच्या नावाचा अर्थ रोशनी, सुर्याची किरणे. माझ्या वडिलांच्या नावाचा अर्थ आहे सुरज. माझ्या नावाचा अर्थ देखील तोच आहे. त्यामुळे मुलीच्या नावाचा अर्थ देखील तसाच शोधला. यामध्ये श्वेताचं नाव देखील आहे.