मुंबई : झगमगती दुनिया बाहेरून रूपेरी दिसत असली तरी या झगमगत्या विश्वातील दुसरी बाजू तितकीचं भयानक आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पडद्यामागे होत असतात आणि त्याची चर्चा मात्र कायम रंगलेली असते. अभिनेता आदित्य पंचोली अनेक चित्रपटांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला. पण तो कायम वादाच्या भोवऱ्यात राहिला. आज त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी जाणून घेवू त्याच्या आयुष्यातील काही वादग्रस्त किस्से. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदित्यवर बलात्काराचे आरोप देखील करण्यात आले. आदित्य पांचोली आणि अभिनेत्री पूजा बेदी यांच्यातील नातं त्यावेळी खूप चर्चेत होतं. पण या नात्याचा शेवट खूप वाईट झाला. आदित्यवर आरोप होता की तो पूजा बेदीच्या गैरहजेरीत घरातील मेडवर शारीरिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता. पूजा बेदीला जेव्हा हे समजले तेव्हा तिने आदित्य पांचोलीसोबतचे नातं तोडलं.



एवढंच नाही तर अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येनंतर आदित्य पुन्हा चर्चेत आला. आदित्यचा मुलगा सूरज पांचोली जियासोबत रिलेशनशिपमध्ये होता. जेव्हा माध्यमांनी त्याला संबंधी प्रश्न विचारले, तेव्हा त्याने महिला पत्रकारावर हल्ला केला. त्याने महिला पत्रकाराला जखमी  केलं आणि हातातील कॅमेरा तोडला. 


आदित्यचं नाव अभिनेत्री कंगना रनौतसोबतही जोडले गेलं. तो 20 वर्षांनी लहान कंगनाच्या प्रेमात होता. काही दिवसांनंतर स्वतः कंगनाने एका मुलाखतीत सांगितले. कंगना इंडस्ट्रीत स्ट्रगल करत होती आणि आदित्य इंडस्ट्रीत तिच्या मेंटॉरच्या भूमिकेत होता. यादरम्यान दोघांची जवळीक वाढली होती.



आदित्य पांचोलीने तिला ड्रग्ज देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचे अभिनेत्रीने तिच्या वक्तव्यात म्हटले होते. तेव्हा देखील आदित्य तुफान चर्चेत आला.