मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत ही पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये कंगनानं ऋतिक रोशन आणि आदित्य पंचोलीवर गंभीर आरोप केले आहेत. ऋतिक रोशनच्या आधी कंगनाचं आदित्य पांचोलीबरोबरही अफेयर होतं. आदित्यनं अनेक वेळा मला शारिरिक इजा केल्याचं कंगना या मुलाखतीमध्ये म्हणाली आहे. एवढच नाही तर कंगनानं आदित्यविरोधात पोलिसांमध्ये तक्रारही केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगनानं केलेले हे आरोप तथ्यहिन असल्याचं आदित्य पांचोली म्हणाला आहे. कंगनाही वेडी असल्याची टीका आदित्यनं केली आहे. अनेक वर्षांपासून मी बॉलीवूडमध्ये आहे पण कोणीच माझ्याबद्दल असं काही बोललं नाही. जेव्हा तुम्ही चिखलात दगड माराल तेव्हा चिखल तुमच्यावरच उडेल, असं वक्तव्य आदित्यनं केलं आहे.


माझ्यासोबत अफेयर असल्याबाबत कंगना खोटं बोलली आहे. कंगनाच्या या वक्तव्याच्या माझ्या कुटुंबावरही परिणाम झाला आहे. याबद्दल मी आणि माझी बायको कंगनावर कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात आहोत, असा इशारा आदित्य पांचोलीनं दिला आहे.